धुळे : निजामपूरला मुलींनी फोडली दहीहंडी

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

याप्रसंगी संस्थेचे संचालक सुमंतभाई शाह, दुल्लभ माळी, मोहन सुर्यवंशी, मार्गदर्शक मुख्याध्यापक एम एम शिंदे मुख्याध्यापक मनोज भागवत, शिक्षक आनंद सोनवणे आदी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी राधा-कृष्णाच्या भूमिकेत होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुलींनी दहीहंडी फोडली.

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठाण संचलित श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूल व श्रीमती आशुमतीबेन चंपकलाल शाह विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

याप्रसंगी संस्थेचे संचालक सुमंतभाई शाह, दुल्लभ माळी, मोहन सुर्यवंशी, मार्गदर्शक मुख्याध्यापक एम एम शिंदे मुख्याध्यापक मनोज भागवत, शिक्षक आनंद सोनवणे आदी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी राधा-कृष्णाच्या भूमिकेत होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुलींनी दहीहंडी फोडली. सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते श्रीकृष्ण राधिकेची वेषभूषा केलेल्या मुला-मुलींनी.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रसन्ना शाह, आयशाबी शेख, नितिन वाघ, किशन वर्मा, जयश्री मोरे, स्वाती कोठावदे, योगिता कोळी, पूनम कोठावदे, दिनेश गवळे ,घन:श्याम परमार आदींनी परिश्रम घेतले.