जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त धुळ्यात भव्य रॅली

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

निजामपूर-जैताणे (धुळे) : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आदिवासी विद्यार्थी संघटना व जिल्ह्यातील सर्वपक्षीय आदिवासी समाज बांधवांतर्फे पारंपारिक वेशभूषेत विविध सांस्कृतिक कलाप्रकारांच्या अविष्कारासह धुळ्यातून भव्य रॅली काढण्यात आली.

निजामपूर-जैताणे (धुळे) : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आदिवासी विद्यार्थी संघटना व जिल्ह्यातील सर्वपक्षीय आदिवासी समाज बांधवांतर्फे पारंपारिक वेशभूषेत विविध सांस्कृतिक कलाप्रकारांच्या अविष्कारासह धुळ्यातून भव्य रॅली काढण्यात आली.

जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. तर सांस्कृतिक रॅलीचे उदघाटन इंजि. एस.एस. पाडवी यांच्या हस्ते झाले. भाजपा आदिवासी आघाडीचे इंजि. मोहन सूर्यवंशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नकाणे रोड, देवपूर येथील साईबाबा मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

डॉ. पुष्पा गावीत व प्रा. मोहन पावरा प्रमुख वक्ते होते. जिल्हा परिषद सदस्या लीला सूर्यवंशी, डॉ. जयश्री गावीत, ज्योती पावरा, प्रकल्प अधिकारी आर. एन. हाळपे, पोलिस निरीक्षक डी. व्ही. वसावे, ऍड. मधुकर भिसे आदी प्रमुख अतिथी व्यासपीठावर उपस्थित होते. तर भगवान वळवी, किरण पाडवी, प्रा.डॉ. भरत पटले, इंजि. राकेश जमानेकर, अनारसिंग पावरा, संजीव पावरा, अविनाश पावरा, अशोक पाडवी, अंकुश सोनवणे, रतीलाल पावरा, इंजि. भटू पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा संकुल, जयहिंद महाविद्यालय, जयहिंद हायस्कुल, इंदिरा गार्डन, प्रमोदनगर, नकाणे रोड मार्गे साईबाबा मंगल कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला.

आदिवासी समाज हा अतिशय निरुपद्रवी, कष्टाळू, निसर्गप्रेमी, व प्रामाणिक असून, युनोने त्यांच्या सांस्कृतिक वेगळेपणाची दखल घेतली व सन 1994 पासून जगात आदिवासी गौरव दिवस साजरा होऊ लागला, असे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नमूद केले.

जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी आदिवासी समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ईश्वर वळवी, आदिवासी एकता परिषदेचे उपाध्यक्ष विक्की कोकणी यांच्यासह विविध सामाजिक संघटना, वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

'ई सकाळ'वरील महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: dhule news world tribal day in dhule