समाजाला दिशा देणारे आध्यात्मिक नेतृत्व हरपले 

समाजाला दिशा देणारे आध्यात्मिक नेतृत्व हरपले 

समाजाला दिशा देणारे आध्यात्मिक नेतृत्व हरपले 

जळगाव  :  राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या अचानक जाण्याने सामाजिक, शैक्षणिक, शेतीला प्राधान्य देणारे, इतरांना दुःखातून बाहर निघण्याचा मार्ग दाखविणारे, आनंदी जीवन जगण्याचा संदेश देणारे, संपर्कातील लोकांसाठी आधार असणारे आध्यात्मिक नेतृत्व हरपले.. अशा शब्दांत भय्यूजी महाराजांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी महाराजांबद्दल "सकाळ'कडे भावना व्यक्त केल्या. 

मार्गदर्शक हरपला 
प्रा.डी.डी.बच्छाव ः भय्यूजी महाराजांचे शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक कार्य वाखाखण्या जोगे आहे. कोपर्डी प्रकरणात एकदा त्यांच्याशी माझा संबंध आला होता. अनेक नागरिक शैक्षणिक समस्या, कुटुंब कलह आदी समस्या घेऊन त्यांच्याकडे जात असत. त्यांनी त्यांना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करून समस्या सोडविल्या होत्या. अनेकांच्या कुटुंबात त्यांनी कलह सोडवून शांतता निर्माण केली होती. शेती, शेतकऱ्यांविषयी त्यांना कळकळ होती. आध्यात्मिक गुरू म्हणून ते सुपरिचित होते. 
 
शेतीच्या कामांचे दिशादर्शक 
डॉ. राजेंद्र पाटील (गणपूर) ः मी त्यांचा अनुयायी आहे. चोपडा, घोडगाव येथे ते आले होते. त्यांचे शिष्य त्यांच्याकडे मदतीसाठी, अडचणी सोडविण्यासाठी जात असे. भय्यूजी महाराजांचे शेती व जलसंधारण क्षेत्रात चांगले कार्य होते. जलसंधारणाच्या कामासाठी ते शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत केली आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सल्ला घेत असे. 
जी घटना घडली ते दुर्दैवी आहे. शिष्य, अनुयायांच्या मनात भय्युजी महाराज वसलेले आहेत. 

धीर देणारे नेतृत्व हरपले 
संजय गरुड (निकटवर्तीय) ः घटना अतिशय दुर्दैवी आहे दुपारी प्रवासात असताना ही दु:खद वार्ता समजली. अत्यंत दुःख वाटले महाराज नेहमी इतरांना दुःखातून बाहर निघण्याचा मार्ग दाखवत होते. त्यांच्या मनात अशी कोणती परिस्थिती ओढविली की त्यांनी असे करून घ्यावे. मनाला न पटणारी ही स्थिती आहे. आनंदी जीवन जगणार कुटुंब व धीर देणार त्याचं नेतृत्व मी जवळून पाहिले आहे. अगदी झोपडीत राहणाऱ्या पासून उच्चभ्रू लोकांच्या समस्या सोडविताना मी जवळून अनुभवले आहे. अजूनही मी खूप मोठ्या विवंचनेत आहे की परमपूज्य महाराजांनी असे का करावे? महाराजांच्या अचानक जाण्याने दुःख आमच्यावर कोसळले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com