आरोग्य विद्यापीठ अधिसभेवर डॉ. नीलम गोऱ्हेंची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेवर विधानमंडळातर्फे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ अधिनियमातील तरतुदीनुसार विधान परिषदेच्या सभापतींनी ही नियुक्ती केली आहे. डॉ. गोऱ्हे यांची नियुक्तीची मुदत 24 एप्रिल 2020 पर्यंत राहणार आहे. विधिमंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांनी ही माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या प्रधान सचिवांना कळवली आहे.