दुष्काळी परिस्थिती असल्याने पालखेड डाव्या कालव्याला त्वरित पाणी सोडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

येवला - पावसाअभावी तालुक्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने पालखेड डाव्या कालव्याला त्वरित पाणी सोडावे तसेच शासनाने त्वरीत चारा छावण्या सुरु कराव्यात. अशी मागणी येवला पंचायत समिती उपसभापती रुपचंद भागवत यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सुरु असलेल्या वर्षीत अत्यल्प पर्ज्यमान असून, तालुक्याचे काही भागात अजून पाऊसही झालेला नाही. ज्या भागात थोडाफार पाउस झाला होता, तिथे शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. परंतु, पिके उगवल्या पासून पाऊस नाही. ४ ते ५ दिवसात पाऊस न आल्यास सर्व पिके खाक होणार आहे. जनावरांचा चारा आता संपलेला आहे. तालुक्यात चारा टंचाई निर्माण झाली आहे. शासनांने तालुक्यात ठिकठिकाणी चारा छावण्या मंजूर कराव्यात. तसेच पाऊस नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 

विहिरी, बोर यांनी तळ गाठला असून, जलस्त्रोत कोरडे झाले आहे. पालखेड डावा कालवाद्वारे पाणी सोडून कालवा लाभ क्षेत्रतील सर्व बंधारे, नाले पाटपाण्याने भरून मिळावेत, अशी मागणी भागवत यांनी केली आहे. निवेदन देतेवेळी नितीन भागवत, साईनाथ मढवई, ज्ञानेश्वर मढवई, सुदाम गायकवाड, मनोज भागवत, ममदापूर व इतर गांवचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Due to drought conditions, leave water immediately to the left wing of Palkhed

टॅग्स