सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले

satana
satana

सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास खुंटला आहे. आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांनी केले.

येथील राधाई मंगल कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काल गुरुवार (ता.१९) रोजी आयोजित बागलाण तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत श्री. ढिकले बोलत होते. व्यासपीठावर मनसे नेते संजय चित्रे, राजा चौगुले, राजेश कदम, प्रवीण मरगज, नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसे गटनेते सलीम शेख, मनसेचे जिल्हाध्यक्ष एड. रतनकुमार इचम, अनिल मटाले, अनंता सूर्यवंशी, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज सोनवणे आदी उपस्थित होते. श्री. ढिकले म्हणाले, अनेक वर्षांपासून सत्ता भोगत असलेल्यांच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण होत नाहीत. त्यामुळे तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. निवडणुकांमध्ये जनतेला खोटी आश्वासने देणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवीन पर्याय म्हणून जनतेने मनसेला एकदा संधी द्यावी. तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पक्षाध्यक्ष राज ठाकरेंचे विचार तळागाळात पोहोचवून निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागावे, अशा सूचनाही श्री. ढिकले यांनी यावेळी केले.     

बागलाण तालुक्याला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा, यासाठी मनसेचे शिष्टमंडळ लवकरच विभागीय आयुक्तांची भेट घेणार असल्याचे राहुल ढिकले यांनी स्पष्ट केले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बैठकीस सुरुवात झाली. मनसेचे तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, शहराध्यक्ष पंकज सोनवणे, सरचिटणीस मंगेश भामरे, पंढरीनाथ अहिरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांच्या हस्ते मनसेच्या ऑनलाइन सभासद नोंदणीचे उद्घाटन झाले. तालुक्यातील प्रलंबित प्रश्न, नागरी समस्या, त्यावरील उपाययोजना याचबरोबर हरणबारी धरणाच्या प्रलंबित डावे उजवे कालवे, केलझर चारी क्रमांक आठ, नामपूर तालुका निर्मिती, बागलाण तालुक्यातील शिवकालीन किल्ल्यांची दुरुस्ती करणे, हेमाडपंथी मंदिरांचा विकास करणे, आदी विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

बैठकीस हर्षवर्धन सोनवणे, जगदीश अहिरे, वैभव सोनवणे, प्रकाश मगर, नामपूरचे शहराध्यक्ष रविंद्र देसले, अरुण पवार, ललित नंदाळे, मनोहर हिरे, दादा इंगळे, अरुण पवार, मंगेश भामरे, दिनेश राजपूत, सागर सोळंके, संदीप शिरसाठ, कुणाल पवार, द्रोणाचार्य चौधरी, जीतू अहिरराव, तुषार भामरे, योगेश सोळंके, मुकेश बाविस्कर, मनोज दशपुते अविनाश दाभाडे, निलेश आहिरे, कुणाल पवार, विशाल बाविस्कर, विशाल अहिरे, मनोज दशपुते, ललित गांगुर्डे, सचिन मोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. रूपेश सोनवणे यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com