दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Durgavir Pratishthan distributes educational material to the needy students
Durgavir Pratishthan distributes educational material to the needy students

सटाणा : बागलाण तालुक्यातील साल्हेर, मुल्हेर यांसह विविध ऐतिहासिक शिवकालीन गडकिल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या येथील दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे काल रविवार (ता.22) रोजी तालुक्यातील आदिवासी पश्चिम भागातील गोरगरीब, आदिवासी, दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

दुर्गवीर प्रतिष्ठाणने तालुक्यातील गड किल्ले संवर्धनाचा वसा हाती घेतला आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून साल्हेर-मुल्हेर या ऐतिहासिक किल्ले तसेच प्राचीन मंदिरे व पाय विहिरींची स्वच्छता व संवर्धनाचे त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरू आहे. हे काम सुरू असताना प्रतिष्ठाणला किल्ले परिसरातील आदिवासी बांधवांना भेडसावणाऱ्या विविध समस्या निदर्शनास आल्या. त्यानुसार, दुर्गवीर प्रतिष्ठाणकडून दरवर्षी दिवाळी, दसरा, पाडवा व अन्य सणासुदीच्या दिवशी गोडधोड, कपडे, फराळाचे पदार्थ, संसारोपयोगी साहित्याची मदत आदिवासी बांधवांना केली जाते. तसेच या भागातील आदिवासी, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेही वितरण करण्यात येते.

यावर्षी, प्रतिष्ठानतर्फे आयोजित अपरिचित गडकोट अभ्यास सहलीप्रसंगी तालुक्यातील कोटबेल-बिजोटे जवळील दगडदेव वस्तीशाळा येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी, किशोर ह्याळीज, दुर्गवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष हसूरकर, संस्कृती हसूरकर, अजित राणे, सचिन जगताप, कल्पना निगडे, गीतांजली लोकेगावकर, देवेश सावंत, रोहित जाधव, प्रवीण खैरनार, हेमंत सोनवणे, विजय शिवदे, पंकज सोनवणे, रोहित सोनवणे, हर्षवर्धन सोनवणे, सागर सोनवणे, सागर गरुडकर, गोरख पगार आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com