इको फ्रेंडली- एज्युकेशनल गार्डन शनिवारपासून खुले 

18jan17-dhule1
18jan17-dhule1

धुळे - शहरालगत वलवाडी शिवारातील चावरा पब्लिक स्कूलने खेळ, मनोरंजनातून शैक्षणिक विकास साधण्यासाठी दुबई, जर्मनीच्या धर्तीवर इको फ्रेंडली- एज्युकेशनल गार्डन विकसित केले आहे. त्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्या आणि जागतिक सौंदर्य स्पर्धेतील मिसेस हेरिटेज मृणाल गायकवाड यांच्या हस्ते शनिवारी (ता. 21) दुपारी पाचला उद्‌घाटन होईल. नंतर ते शहरासह जिल्ह्यातील चिमुकल्यांपासून सातवी ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले होईल. 

फादर शीजन यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, की चावरा पब्लिक स्कूलच्या आवारात 9000 चौरस फुटांत अद्ययावत फादर डायगो मेमोरिअल गार्डन विकसित केले. काही पालकांची ऐच्छिक मदत आणि संस्थेच्या विश्‍वस्त मंडळाने केलेल्या सहकार्यामुळे उद्यान साकारता आले. त्याचे 80 टक्के काम झाले असून उर्वरित वीस टक्के काम लवकर पूर्ण करण्याचा मानस आहे. उद्यान चावरा स्कूलच्या स्टेट बोर्ड आणि सीबीएससी शाखेच्या विद्यार्थ्यांसह शहरातील चिमुकल्यांपासून सरासरी सातवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले असेल. इतर शालेय विद्यार्थ्यांना उद्यानाला भेटीची वेळ लवकरच जाहीर केली जाईल. 

उद्यानाचे वैशिष्ट्य 
उद्यानात दुबईच्या धर्तीवरील "ग्लोब'मुळे तापमान, एकाग्रतेविषयीची माहिती विद्यार्थ्यांना मिळेल. हस्ताक्षर सुधारणेसाठी वाळू (रेती) असेल. त्यात विद्यार्थ्यांना नीटनेटकी अक्षरे गिरवून दाखविण्याचा सराव करून घेतला जाईल. डायनासोरच्या प्रतिकृतीत गुफा केली आहे. त्यातील सफरीतून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास वाढविण्याचा प्रयत्न असेल. उद्यानातील "आक्‍टोपसचे स्टेज' आकर्षण असेल. त्याचा सरासरी तीन ते पाच वर्षांच्या विद्यार्थ्यांमधील आत्मविश्‍वास उंचावण्यासाठी उपयोग होऊ शकेल. प्रेक्षक नसणाऱ्या या स्टेजवर विद्यार्थी एकत्रपणे कलागुण सादर करू शकतील. गटचर्चा, स्व-कौशल्यातून व्यक्तिमत्त्व विकास साधू शकतील. उद्यानात "ऍक्‍युप्रेशर'बाबत सुविधा आहे. जर्मनीच्या धर्तीवर इको- फ्रेंडली "व्हीआयपी स्टेज' आहे. पंधरा फूट उंचीवर ते स्टेज आहे. यात शिक्षक, मान्यवर, तज्ज्ञ विविध विषयांवर चर्चा करू शकतील, असे फादर शीजन यांनी सांगितले. 

"दिल- से'चे आकर्षण 
शनिवारी उद्यानाच्या उद्‌घाटनानंतर चावरा पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी "दिल से' हा बहारदार कार्यक्रम होईल. श्री. चैतन्या, सौ. गायकवाड, चावरा संस्थेचे व्यवस्थापक फादर थॉमस, स्कूलचे फादर सेबी, चावरा विद्यानिकेतनचे फादर जिंन्टो, विद्यार्थी प्रतिनिधी राज महाले, अपूर्वा अमृतकर उपस्थित असतील, असे चावरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य फादर शीजन यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com