शैक्षणिक व्हिडिओनिर्मितीबाबत धुळ्यात उद्यापासून कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

कासारे - नाशिक विभागातील सर्वच शाळा डिजिटल झाल्या आहेत. एवढ्यावरच न थांबता डिजिटलायझेशन शिक्षण मजबूत करणारे, शिक्षकांना ई-लर्निंगचे ज्ञान देण्यासाठी एक एप्रिलपासून धुळे येथे शैक्षणिक व्हिडिओनिर्मिती कार्यशाळा होत आहे. यासाठी http://goo.gl/pWXJxZ या संकेतस्थळावर ऑनलाइन नावनोंदणी सुरू आहे.

नॉलेज ब्रिज फाउंडेशन, प्राथमिक शिक्षक व तंत्रस्नेही ग्रुपतर्फे ई-लर्निंगचे साहित्य कमी वेळेत कसे निर्माण करावे, यासाठी होत असलेली ही कार्यशाळा पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित आहे. 

चावरा स्‍कूलमध्ये कार्यशाळा
धुळे येथील वलवाडी शिवारातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवारी (ता. १) दुपारी बारा ते पाच व रविवारी (ता. २) सकाळी दहा ते पाच या वेळेत होणाऱ्या या कार्यशाळेत भूषण कुलकर्णी, एकनाथ कोरे मार्गदर्शन करतील. 

मोफत उपक्रम
कार्यशाळा मोफत असून, तीत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सहभागी होऊ शकतील.

शाळेला प्रसिद्धी कशी द्यावी, लोकसहभागासाठी आवश्‍यक क्‍लृप्त्या कशा अवलंबाव्यात, डिजिटल गॅदरिंग, चांगल्या कामांची दखल घेतली जावी यासाठी प्रोफेशनल क्वालिटी, आवाज रेकॉर्ड करणे व डबिंग करणे, आपल्या कलागुणांना वाव कसा मिळेल याचे तंत्र शिकणे, पाठाची ध्वनिचित्रफीत तयार करणे, कवितेची ध्वनिचित्रफीत तयार करणे, शॉर्ट फिल्म मेकिंग, क्रोमा इफेक्‍ट, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आदींबाबत तज्ज्ञांकडून कार्यशाळेत मार्गदर्शन होईल. अधिकाधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, डाएटच्या प्राचार्या, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्ताराधिकाऱ्यांनी केले.