मोटर सायकल रॅली, सभांनी झाली प्रचाराची सांगता 

प्रशांत बैरागी 
सोमवार, 28 मे 2018

नामपूर (नाशिक) : येथील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर मोसम खोऱ्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मोटर सायकल रॅली, गावनिहाय प्रचार सभा, मतदारांच्या भेटी आदींच्या माध्यमातून मोसम खोऱ्यात जाहीर प्रचाराची सांगता झाली.

निवडणुकीसोबतच आगामी काळात होणाऱ्या सभापती निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय डावपेच खेळले जात आहे. निवडणूक पार्श्वभूमिवर होणाऱ्या लक्ष्मीदर्शनाने काही गनांमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

सटाणा बाजार समितीच्या विभाजनानंतर निवडणूक प्राधिकरणच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच नामपूर बाजार समितीची निवडणूक होत असल्याने शेतकरी सभासदांमध्ये प्रचंड उत्साह आहे. काही मतदार संघात मतदारांना धनलक्ष्मीचे दर्शन झाले असून काहीं ठिकाणी आस लागून आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. 

राज्यात बाजार समीत्यांमध्ये सर्रासपणे होणारी शेतकऱ्यांची लूट ही सर्वज्ञात होती. यापूर्वी ग्रामपंचायत व सहकारी सोसायटयांचे संचालक मंडळ घोडेबाजार करून  बाजार समितीचा कारभारी निवडत. परंतु सत्ताधारी शासनाने लोकशाहीच्या मूल्यांच्या बळकटीसाठी सर्व शेतकऱ्यांना बाजार समिती मतदानाचे सर्व अधिकार बहाल केल्यामुळे बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बाजार समितीची दारे खुली झाली आहेत. 

यंदा प्रथमच सर्व शेतकरी बाजार समिती प्रशासनाची सुत्रे सांभाळणार असल्याने निवडणुकीबाबत मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शेतकरी संचालक मंडळामुळे आगामी काळात राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक शोषणास  आळा बसेल, अशी अपेक्षा मोसम खोऱ्यातील शेतकरी सभासदांनी व्यक्त केली. मोसम खोऱ्यात निवडणूक जाहीर प्रचाराच्या अंतिमदिनी रविवारी (ता. 27) सर्वच गनांमध्ये जोरदार प्रचार करण्यात आला.  नात्यागोत्यांच्या भेटीगाठीतून सत्तेची स्वप्न पाहिली जात असून सर्वच उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे. मतदानाला केवळ एक दिवस शिल्लक असल्याने उमेदवार, कार्यकर्ते गुप्त प्रचारप्रक्रियेत व्यस्त आहेत.

नामपूर बाजार समितीच्या 13 जागांसाठी 34 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी नामपूर, ब्राम्हणपाडे, बिजोटे या तीन गणातील उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना बिनाशर्त जाहीर पाठिम्बा दिला आहे. उर्वरीत 10 जागांसाठी अत्यंत्य चुरशीच्या लढत होत आहेत. निवडणूक अंतिम टप्प्यात असल्याने उमेदवार व त्यांचे समर्थक जीवाचे रान करून अधिकाधिक मतदारांना बाजार समितीच्या  विकासाची स्वप्न दाखवत आहेत. ऐन निवडणूकीच्या प्रचार काळात होणाऱ्या माघारीमुळे राजकीय समिकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: election campaign ends with motor cycle rally and sabha