शंभर युनिटसाठी आता आठ रुपये अधिक भार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

जळगाव - राज्यातील जनतेला "महावितरण'ने घरगुती आणि व्यावसायिक वीजदरात वाढ करण्याचा निर्णय काल जाहीर करून जोरदार धक्का दिला. या निर्णयामुळे आता घरगुती वीजग्राहकांना प्रतियुनिट तीन पैसे अधिक म्हणजे शंभर युनिटसाठी आठ रुपये अधिक बिल भरावे लागणार आहे. डिसेंबरमध्ये येणाऱ्या नोव्हेंबरच्या बिलापासून या दरवाढीचा अतिरिक्‍त भार ग्राहकांना यापुढे सहन करावा लागणार आहे.

जळगाव - राज्यातील जनतेला "महावितरण'ने घरगुती आणि व्यावसायिक वीजदरात वाढ करण्याचा निर्णय काल जाहीर करून जोरदार धक्का दिला. या निर्णयामुळे आता घरगुती वीजग्राहकांना प्रतियुनिट तीन पैसे अधिक म्हणजे शंभर युनिटसाठी आठ रुपये अधिक बिल भरावे लागणार आहे. डिसेंबरमध्ये येणाऱ्या नोव्हेंबरच्या बिलापासून या दरवाढीचा अतिरिक्‍त भार ग्राहकांना यापुढे सहन करावा लागणार आहे.

"महावितरण'ने वीज नियामक आयोगाकडे दरवाढीची परवानगी मागितली होती. त्यास आयोगाने मंजुरी देत दीड टक्का दरवाढ करण्यास मान्यता दिली आहे. ही दरवाढ आगामी चार वर्षांसाठी बहुवार्षिक वीजदर निश्‍चित करताना यंदा दीड टक्का करण्यात आली असून, 2017-18 वर्षासाठी ती दोन टक्‍के असेल. एक नोव्हेंबरपासून सुधारित नवीन वीजदर लागू करण्यात आले असून, ग्राहकांना डिसेंबरमध्ये येणाऱ्या नोव्हेंबरच्या बिलात वीजवापरासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. वाढीव बिलांमुळे आधीच त्रासलेल्या ग्राहकांसाठी "महावितरण'ने दरवाढीच्या रूपाने आणखी एक धक्का दिला आहे.

आठ रुपयांचा भार
"महावितरण'ने केलेल्या दीड टक्का दरवाढीमुळे घरगुती वीजग्राहकांना आपल्या बिलातील 0 ते 100 युनिटसाठी आठ रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. त्यात बिलातील सर्वसाधारण दरात यापूर्वी 50 रुपये आकारले जात असून, यात पाच रुपयांची वाढ होऊन ते आता 55 रुपये इतके लागतील, तर एनर्जी चार्जेसमध्ये तीन रुपयांची वाढ झाली आहे. अर्थात घरगुती ग्राहकांना 31 ऑक्‍टोबरपर्यंत शंभर युनिटसाठी प्रतियुनिट 4 रुपये 13 पैसे चार्जेस होते, ते आता प्रतियुनिट 4 रुपये 16 पैसे लागतील. तर 100 युनिटसाठी प्रतियुनिट 7 रुपये 88 पैशांवरून 7 रुपये 91 पैसे इतका दर झाला आहे. म्हणजेच प्रतियुनिट तीन पैशांची वाढ असल्याने शंभर युनिटसाठी एकूण आठ रुपयांची वाढ झाली आहे, तर व्यावसायिक वापरासाठीचा वीजदर 200 युनिटपर्यंत 7 रुपये 28 पैशांवरून 7 रुपये 27 पैसे झाले म्हणजे यात एक पैशाने दर कमी झाल्याचे "महावितरण'ने सांगितले.

वाढीव बिलात आणखी भर
मीटर रीडिंग व बीलिंगचे काम "महावितरण'ने ठेकेदारांना दिले आहे. या ठेकेदारांकडून दर महिन्याला घेण्यात येणारे रीडिंग नियमित नसल्याने दीड महिन्याच्या बिलाची आकारणी होत असते. त्यामुळे युनिट जास्त झाल्याने वाढीव बिल येते. यात आता दरवाढ झाल्याने ग्राहकांना यापुढे बिलावर रकमेचा मोठा आकडा पाहावयास मिळेल. याचा नाहक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागेल.

Web Title: electricity rate increase

टॅग्स