दोन भावी अभियंत्यांचा जळगावात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

जळगाव - मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेलेले भूषण प्रकाश पाटील (वय 19) व निखिल विजय पाटील (वय 18, दोघे रा. नंदुरबार) हे बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी मेहरुण तलावात बुडून मृत्युमुखी पडले. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

भूषण हा स्थापत्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता; तर निखिल पहिल्या वर्षात होता. ते व त्यांचे तीन मित्र आज पेपर सुटल्यावर पोहण्यासाठी मेहरुण तलावावर गेले होते. अर्धा-पाऊण तासापासून पोहत असताना भूषण व निखिल इतर तिघांपासून थोडे दूरवर सरकले. पोहताना या सर्वांची दंगामस्ती सुरू होती. निखिल व भूषण हे दोघेही दूरवर खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याने तिघांनी पाहिले व त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरड केली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. दोन अडीच तास शोध घेतल्यावर सायंकाळी त्यांचे मृतदेह आढळले.

...प्राण वाचवता आले असते
मेहरुण तलावात पोहण्यासाठी आलेल्या महाविद्यालयीन पाच मित्रांमध्ये पोहताना दंगामस्ती सुरू होती. दुसऱ्या बाजूला काठावर नित्याचे पोहणारे व तलावाच्या तळाची माहिती असणारे काही तरुण काठावर पत्ते खेळत बसले होते. आरोळ्या ऐकू आल्यावर त्यांना संशय आला. मात्र बऱ्याच वेळेपासून हे पाचही तरुण दंगामस्ती करीत असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले.

Web Title: engineer drawn