जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

एरंडोल (जि. जळगाव) - चोरटक्की (ता. एरंडोल) येथील हरी दिगंबर पाटील (वय 45) या कर्जबाजारी शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आज आत्महत्या केली. पाटील यांच्यावर विविध कार्यकारी संस्था व सावकाराचे कर्ज होते.

एरंडोल (जि. जळगाव) - चोरटक्की (ता. एरंडोल) येथील हरी दिगंबर पाटील (वय 45) या कर्जबाजारी शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आज आत्महत्या केली. पाटील यांच्यावर विविध कार्यकारी संस्था व सावकाराचे कर्ज होते.

पाटील यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. शेतीत होणारे नुकसान, वाढलेले कर्ज आणि मुलींच्या विवाहाची चिंता या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे वडील, पत्नी, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे.