घोटी पोलिसांकडून चार लाख किंमतीचे गोमांस जप्त

गोपाळ शिंदे
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

जनावरांची विना परवाना कत्तल केलेले चार लाख रुपये किंमतीचे तब्बल पाच टन मांस सापडले. पोलिसानी ट्रक ताब्यात घेत मांस जमिनीत पुरून नष्ट करण्यात आले. ट्रक चालक शेख मजहार(वय 23)  व ट्रक वाहक अनिस अब्बास शहा(वय22) दोघेही रा. मालेगाव आजाद नगर यांस ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोटी: घोटी शिवारात टोल नाक्यावर बेकायदेशीर गोमांसाची वाहतूक करताना मालेगाव येथील ट्रक पकडण्यात घोटी पोलिसांना यश आले आहे. खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे साहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे अडीच वाजेपासून सापळा लावत पाळत ठेवण्यात आली होती, याच दरम्यान, साडे सहा वाजेस पोलिसांच्या पथकाने घोटी टोल नाक्यावर गोमांस घेऊन जाणारा मालेगाव येथून भिवंडी कडे जाणारा ट्रक क्रमांक एमएच 15, सीके,6895  ट्रकवर छापा टाकला. यावेळी वाहन चालकासह वाहक पळून जाण्याचा प्रयत्न करत असतात साध्या वेषातील पोलिसांनी जागेवरच मुसक्या अवळल्याने त्यांना पळता आले नाही, अचानक पोलिसांच्या कारवाईने चालक व वाहकाचे धाबे दणाणून गेले.

जनावरांची विना परवाना कत्तल केलेले चार लाख रुपये किंमतीचे तब्बल पाच टन मांस सापडले. पोलिसानी ट्रक ताब्यात घेत मांस जमिनीत पुरून नष्ट करण्यात आले. ट्रक चालक शेख मजहार(वय 23)  व ट्रक वाहक अनिस अब्बास शहा(वय22) दोघेही रा. मालेगाव आजाद नगर यांस ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे,साहायक उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस हवलदार लहू चव्हाण,पोलीस नाईक  शितल गायकवाड,सुरेश सांगळे,सुहास गोसावी पथकात सामील होते.

टॅग्स