पंचवटी स्कूलमध्ये 28 नोव्हेंबरपासून विज्ञान प्रदर्शन 

sciece exhibition
sciece exhibition

इगतपुरी : टाके घोटी येथील पंचवटी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इगतपुरी पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघातर्फे 43 व्या तालुका विज्ञान प्रदर्शनाची सभा झाली. गटशिक्षणाधिकारी शिवाजी अहिरे अध्यक्षस्थानी होते. या वेळी नवीन इगतपुरी तालुका विज्ञान अध्यापक संघाच्या नूतन कार्यकारिणीचीही निवड झाली. 

तालुकाध्यक्षपदी के. के. पवार यांची तिसऱ्यांदा फेरनिवड झाली. उपाध्यक्ष जी. डी. चव्हाण, कार्यवाहक एम. एस. कदम, कोशाध्यक्ष व्ही. पी. सोनवणे, सहकोशाध्यक्ष ताराचंद मेतकर, महिला प्रतिनिधी आशा तांबे, सदस्यपदीकरवर, श्री. इंगळे, श्री. नायकुडी, तसेच जिल्हा प्रतिनिधीपदी वाय. बी. दाणी यांची सर्वानुमते निवड झाली. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 28, 29 व 30 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. 

सभेला विस्ताराधिकारी एन. डी. मोरे, राजेंद्र नेरे, बी. पी. मोरे, पी. एन. सांगळे, राजेंद्र मगरे, केंद्रप्रमुख विलास बत्तीसे व तालुक्‍यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व विज्ञानशिक्षक उपस्थित होते. विस्ताराधिकारी अशोक मुंडे यांनी प्रास्ताविक केले. संयोजक प्राचार्य आशिष खुळे यांनी आभार मानले. 

विज्ञान प्रदर्शनातील विषय 
शाश्‍वत विकासासाठी नावीन्य उपक्रम कचरा व्यवस्थापन, गणितीय प्रतिकृती, डिजिटल तांत्रिक समाधान, लोकसंख्या शिक्षण, दळणवळण, अन्नसुरक्षा व सुदृढ आरोग्य आदी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com