चाळीसगाव : विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

लाकूड व्यापारी बिस्मिल्ला उस्मान मण्यार यांच्या मालकीचे लाकूड काल(ता. 8) सायंकाळी देशमुखवाडी रस्त्यालगत विनापरवाना टेम्पोतून(क्र. एमएच 18, ए 7601) वाहतूक करताना आढळून आला. टेम्पोत निंबाचे लाकूड भरले होते. येथील शिवारातून लाकूड तोडून मालेगावकडे टेम्पो रवाना होणार होता.

पिलखोड(ता. चाळीसगाव) : येथून विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर काल सायंकाळी साडे सहाच्या सुमारास वन विभागाने कारवाई करून जप्त करण्यात आला आहे. विनापरवाना वाहतूक करणाऱ्या लाकूड व्यापाऱ्यावर पुढील कारवाई सुरू आहे.

लाकूड व्यापारी बिस्मिल्ला उस्मान मण्यार यांच्या मालकीचे लाकूड काल(ता. 8) सायंकाळी देशमुखवाडी रस्त्यालगत विनापरवाना टेम्पोतून(क्र. एमएच 18, ए 7601) वाहतूक करताना आढळून आला. टेम्पोत निंबाचे लाकूड भरले होते. येथील शिवारातून लाकूड तोडून मालेगावकडे टेम्पो रवाना होणार होता. मात्र, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबतीत माहिती मिळाल्यानंतर लाकूड व्यापारी बिस्मिल्ला उस्मान मण्यार व टेम्पोचालक इस्माईल शेख गनी मण्यार यांच्यावर कारवाई करत टेम्पो जप्त केला. त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 च्या 41-2(ब) नुसार विनापरवाना लाकूड वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

पाहणीसाठी आले; टेम्पो जप्त करून गेले...
पिलखोड शिवारात बिबट्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी गुरुवारी(ता. 7) प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी संजय एस. मोरे व कर्मचारी आले होते. पाहणी करून परतताना त्यांना विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या टेम्पोची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वनरक्षक प्रकाश पाटील यांना कारवाई करण्याचे आदेश देत टेम्पो जप्त केला.

टॅग्स