डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते ग्राहक पंचायतीच्या राज्यव्यापी मेळाव्याचे उद्घाटन

dr. subhash Bhamare
dr. subhash Bhamare

सोनगीर (धुळे) - दहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे येत्या चार - पाच महिन्यांत उद्घाटन होईल, या मार्गावरील सोनगीरला सर्व सुविधायुक्त भव्य रेल्वे स्थानक बनविण्यात येईल तसेच दिल्ली - मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर 2019 साठी धुळे जिल्ह्याची निवड झाली आहे व इंडस्ट्रीयल झोन हा सोनगीर ते नरडाणा दरम्यान असेल, असे सांगत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी ग्रामस्थांना आज सुखद धक्का दिला. एवढेच नव्हे तर तापी-जामफळ- कनोली प्रकल्पासाठी 2360 कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच कामाला सुरुवात होईल असेही ते म्हणाले.

डॉ.भामरे म्हणाले की, ग्राहकांत जागृती नसल्याने व ते संघटीत नसल्याने त्यांची लुबाडणूक होते. अशा ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य ग्राहक पंचायत करीत आहे. ग्राहकांचे आठ अधिकार लिहिलेला फलक गावोगावी ग्रामपंचायत कार्यालयात लावावा, ग्राहकांनी सतत जागरूक राहून फसवणूकीला बळी पडू नये.

अक्कलपाडा धरणासाठी 250 व 285 कोटी रुपयांचे  दोन हप्ते मिळवून दिले, सोनगीरला कबरस्थान ट्रस्टचे आवाराची भिंत व  गावातील रस्तेसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये दिले. पुढेही विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, लवकरच सोनगीरचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन डॉ.भामरेनी दिले.

वेळी राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी गावोगावी ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. रवींद्र महाजनी यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक नाशिक विभागीय अध्यक्ष अरुण भार्गवे यांनी केले. सुत्रसंचलन शेखर देशमुख, आरीफखाँ पठाण यांनी केले. डॉ. अजय सोनवणे यांनी आभार मानले.  

आजपासून (ता. 19)दोन दिवसीय ग्राहक पंचायतीचे राज्यव्यापी मेळाव्याचे उद्घाटन डॉ. भामरे यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष डॉ. विजय लाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे अरविंद जाधव, राज्य संघटक सर्जेराव जाधव, नाशिक विभागीय अध्यक्ष मार्तंडराव जोशी, विभागीय संघटक अरुण भार्गवे, सहसंघटक डॉ. योगेश सुर्यवंशी, माजी महापौर मंजुळा गावित,  पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, उपसरपंच धनंजय कासार, राज्य सचिव अर्जुन वाघमारे, वसंत देशमुख,  राज्य सहसंघटक मेघाताई कुलकर्णी. प्रकाश पाठक, अनिल जोशी, पवन अग्रवाल, डाॅ विजय लाड, सुरेश वाघ, प्रा. डॉ. देसले, सर्जेराव जाधव, अजय भोसरेकर उपस्थित होते. येथील आनंदवन संस्थानच्या सभागृहात मेळावा सुरू आहे. 

मेळाव्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. भामरे यांच्या हस्ते ग्राहक पंचायतीचे मानचिन्हाचे तसेच ग्राहक पंचायतीचे मुखपत्र ग्राहकतीर्थ च्या प्रथम अंकाचे प्रकाशन झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com