जळगाव: 'यिन' जिल्हाध्यक्षपदी अभिजित रंधे, विजय पाटील 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

'यिन' व्यासपीठांतर्गत गेल्या महिनाभरापूर्वी महाविद्यालयीन स्तरावर प्रत्येक महाविद्यालयातून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. यात निवड झालेल्या जिल्ह्यातील पंधरा अध्यक्ष व पंधरा उपाध्यक्षांमधून आज लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. यात ग्रामीण व शहरी जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष असे प्रत्येकी दोन उमेदवारांची एक वर्षासाठी निवड करण्यात आली.

जळगाव - 'सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन अध्यक्ष व उपाध्यक्षांमधून जिल्हाध्यक्ष व उपजिल्हाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया आज 'सकाळ'च्या औद्योगिक वसाहतीतील मुख्य कार्यालयात उत्साहात पार पडली. यात शहर जिल्हाध्यक्षपदी अभिजित रंधे तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विजय पाटील यांची तर ग्रामीण उपजिल्हाध्यक्षपदी निकीता पाचपांडे या विद्यार्थीनीची निवड झाली. प्रारंभी लोकशाही पध्दतीने मतदान करत ही प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. निकालानंतर विद्यार्थ्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. 

'यिन' व्यासपीठांतर्गत गेल्या महिनाभरापूर्वी महाविद्यालयीन स्तरावर प्रत्येक महाविद्यालयातून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. यात निवड झालेल्या जिल्ह्यातील पंधरा अध्यक्ष व पंधरा उपाध्यक्षांमधून आज लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. यात ग्रामीण व शहरी जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष असे प्रत्येकी दोन उमेदवारांची एक वर्षासाठी निवड करण्यात आली. यात वर्षभर विद्यार्थ्यांना आपले नेतृत्व सिद्ध करता येणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. मतदानानंतर निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यानंतर महाविद्यालयीन स्तरावर निवडून आलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

'युवती' अध्यक्षपदी सायली 
यंदा नव्यानेच "यिन' युवती अध्यक्ष हे पद तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयीन स्तरावर निवडून आलेल्या "यिन' युवतींमधून एक युवती अध्यक्षपदी निवडली गेली. यात बेंडाळे महाविद्यालयातील सायली जाधव हीची अध्यक्षपदी तर पूजा सपकाळे हीची उपाध्यक्षपदी निवड झाली. प्रथमच या पदासाठी मतदान झाल्याने युवतींमध्ये उत्साहपूर्ण वातावरण होते.