'एस्क्रो'वर मैत्रेय भरणार 9.5 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

"एस्क्रो'वरून सात महिन्यांच्या कालावधीत आत्तापर्यंत नऊ हजार 410 गुंतवणूकदारांना न्यायालयाच्या मान्यतेनुसार सुमारे सात कोटींचे वाटप झाले आहे. त्यासाठी प्राधान्यक्रमाने 27 याद्या तयार करण्यात आल्या होत्या. 
 

नाशिक - मैत्रेय कंपनीचे जळगावातून हॉटेलच्या विक्रीतून येणारी नऊ कोटी 50 लाखांची रक्कम लवकरच "एस्क्रो' खात्यावर जमा होणार आहे. या व्यवहारातील आगावू रक्कम 61 लाख आणि त्यानंतर एक कोटीची रक्कम "एस्क्रो' खात्यावर जमा झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. आतापर्यंत "एस्क्रो'वरून सुमारे साडेनऊ हजार गुंतवणूकदारांना सात कोटींचे वाटप झाले. 

मैत्रेय प्लॉटर्स ऍण्ड रिऍल्टर्स कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या वर्षी फेब्रुवारीत गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीच्या मालकीच्या जळगावमधील हॉटेलची सुमारे 11 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. या सौद्यातील उर्वरित रक्कम मिळताच नऊ कोटी 50 लाख रुपयेही "एस्क्रो' खात्यावर जमा होणार आहेत.

दरम्यान, "एस्क्रो'वरून सात महिन्यांच्या कालावधीत आत्तापर्यंत नऊ हजार 410 गुंतवणूकदारांना न्यायालयाच्या मान्यतेनुसार सुमारे सात कोटींचे वाटप झाले आहे. त्यासाठी प्राधान्यक्रमाने 27 याद्या तयार करण्यात आल्या होत्या. 
 

Web Title: 'Eskro of Maitreya fill 9.5 million