नाशिक - कोठारे येथे समस्यांनी ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ त्रासले

ambasan
ambasan

अंबासन (नाशिक) : कोठरे (ता. मालेगाव) या ग्रामपंचायत असलेल्या गावात विविध समस्यांनी ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ त्रासलेले आहेत. ग्रामपंचायतीत म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केला आहे. गावात डासांचा उपद्रव वाढला आहे. तसेच भूमिगत केलेल्या गटारींचे चेंबरचे साफसफाई होत नाही. यामुळे रोगराईचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता बळावली असल्याचे नागरिकांनी सांगितले. ग्रामपंचायत कार्यालयात अनेक वेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. 

ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या कोठरे खुर्द व कोठरे बुद्रुक या दोन्ही गावात अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. गावात डासांचा उपद्रव वाढला आहे. अनेक वेळा संबंधित ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीत गाऱ्हाणे मांडण्याचे प्रयत्न केले. मात्र लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. ग्रामपंचायतीने स्वतंत्र धुराळ यंत्र घेतले आहे. परंतू अनेक महिन्यांपासून त्यात बिघाड झाल्याने कोपऱ्यात पडले आहे. तसेच दोन्ही गावांमध्ये भूमिगत गटारी केल्या आहेत. तेथील चेंबरची वेळोवेळी साफसफाई केली जात नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अनेक चेंबर नादुरुस्त स्थितीत आहेत यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गावात सन २००९-१० मध्ये भारत निर्माण पाणीपुरवठा योजना ४२ लक्ष खर्च करून राबविण्यात आली आजतागायत सुरू झालीच नाही. यामुळे नागरिकांना एकाच जलकुंभावर पाणीपुरवठा करावा लागतो आणि प्रत्येक नळधारकापर्यंत पाणी पोहचत नसल्याने संताप व्यक्त केला जातोय. सन १९९७-९८ मध्ये बबलू प्रल्हाद सोळुंखे या लाभार्थ्यास घरकुल देण्यात आले. घरकुलाचे संपूर्ण काम त्यावेळी पुर्ण झाले असतांनाही ग्रामपंचायतीच्या '८ड'ला नावच नसल्याची धक्कादायक बाब सांगण्यात येते. श्री. सोळुंखे यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात अनेक खेट्या मारुनही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जनसुविधा योजनेंतर्गत सन २०१२-१३ मध्ये गावासाठी नव्याने ग्रामपंचायत इमारत व अंगणवाडी मंजूर झाली होती. या दोन्ही इमारतीचे काम चक्क नाल्यात ज्या ठिकाणावर महिला शौचास जातात तेथे बांधण्यात आली आहे. विशेष म्हणजे या इमारतीत जाण्यासाठी व्यवस्थितपणे रस्त्यासुध्दा नाही. काम अपूर्ण असतांनाही संबंधित ठेकेदाराने कागदोपत्री काम पुर्ण झाल्याची नोंद केल्याचे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सांगितले. लेंडी नाल्यात पूरग्रस्त ठिकाणी बांधण्यात आलेली दोन्ही इमारती निकृष्ठ दर्जाच्या बांधण्यात आलेल्या असल्याचे सदस्यांनी सांगितले. या इमारती नागरीकांसाठी प्रसादन ग्रु-हे झाल्याचे चित्र आहे. रात्री अपरात्री येथे टवाळखोर मुलामुलींना सोयीची जागा मिळाली असल्याचेही यावेळी नागरिकांनी सांगितले. या दोन्हीही इमारतीची चौकशी करावी जोपर्यंत चौकशी केली जात नाही ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी इमारतीला टाळे ठोकले आहे.

गावात डासांचे साम्राज्य पसरले आहे. भूमिगत गटारींचे चेंबर वेळोवेळी साफसफाई केली जात नाही. ग्रामपंचायतीत सदस्यांचे ग्रामसेविका ऐकून घेत नाहीत, असे ग्रामपंचायत सदस्य खुमानसिंग तवर यांनी सांगितले.

आमची अपेक्षा एकच होती. गावाचा विकास झाला पाहिजे लेंडी नाल्यावरील बांधलेली ग्रामपंचायत व अंगणवाडीचे काम कागदोपत्री झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र काम अपूर्ण आहे. चौकशी झालीच पाहिजे, मच्छींद्र सोळुंखे यांनी सांगितले. 

फाॅगन मशीन दुरूस्तीसाठी पाठविण्यात आले आहे. मशीन आल्यावर लवकरच गावात फवारणी केली जाईल. तसेच गावातील भूमिगत गटारींच्या चेंबरचे दुरूस्ती काम सुरू आहे. असे ग्रामसेविका नम्रता मोरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com