फडणीस ग्रुपच्या संचालिकेला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

नाशिक - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी पुण्यातील फडणीस इन्फ्रास्ट्रक्‍चर व फडणीस ग्रुपच्या संचालिका भाग्यश्री सचिन गुरव यांना काल (सोमवारी) पुण्यातून अटक करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना आज 29 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गेल्या महिन्यामध्ये ग्रुपचे मुख्य संचालक विनय फडणीस यांना मुंबईतून आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत 460 गुंतवणूकदारांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार फसवणुकीचा आकडा 17 कोटी 89 लाख रुपयांपर्यंत पोचला. आर्थिक गुन्हे शाखेने काल पुण्यातील फडणीस ग्रुपच्या कार्यालयावर छापा टाकून चौकशीदरम्यान भाग्यश्री गुरव यांना अटक केली. गुरव यांना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना येत्या 29 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.