वाढणाऱ्या धर्मांधशक्तीला वेळीच आवरा - बळिराम भोंबे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

नंदुरबार - देशात धर्मांधशक्तीच्या कारवाया वाढत आहेत. यास वेळीच आवर घालावा. देशाची एकात्मता धोक्‍यात येऊ नये, यासाठी काम होणे आवश्‍यक आहे, असे मत शेतमजूर युनियनचे राज्य सचिव बळिराम भोंबे यांनी केले.

 

नंदुरबार - देशात धर्मांधशक्तीच्या कारवाया वाढत आहेत. यास वेळीच आवर घालावा. देशाची एकात्मता धोक्‍यात येऊ नये, यासाठी काम होणे आवश्‍यक आहे, असे मत शेतमजूर युनियनचे राज्य सचिव बळिराम भोंबे यांनी केले.

 

शेतमजूर युनियनचे आठवे जिल्हास्तरीय अधिवेशन प्रकाशा (ता. शहादा) येथे झाले. जिल्ह्यातील प्रतिनीधी उपस्थित होते. शेतमजूर युनीयनचे राज्य अध्यक्ष नथू साळवे अध्यक्षस्थानी होते. श्री. भोंबे यांनी उदघाटन केले. अधिवेशनासाठी सुनील गायकवाड, झुनाभाई सोनवणे, मंगलसिंग चौहाण यांच्या मंडळाची निवड करण्यात आली. श्री. भोंबे यांनी शेतमजूरांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला. आपल्या देशात जातीयवादापेक्षा धर्मांध शक्तीचे प्राबल्य वाढत आहे. त्यास वेळीच आळा घालणे आवश्‍यक आहे. शेतमजूरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एकीने राहणे आवश्‍यक आहे. आपली एकी आपली शक्ती आहे.

साळवे म्हणाले, देशातील, राज्यातील सामाजिक, राजकीय, अर्थिक शोषणाविरुध्द लोकशाही मार्गाने श्रमीकांनी लढा दिला पाहिजे. सर्वांनी एकत्र येउन संघर्षाची वेळ आली आहे.

संघटनेचा जिल्ह्याच्या तीन वर्षाच्या वाटचालीचा आढावा सचिव अनील ठाकरे यांनी माडला. सामाजिक, राजकीय, अर्थिक विषयावर अधिवेशनात १३ वक्‍त्यांनी विचार मांडले. तीन वर्षासाठी नवीनइ कार्यकारीणी गठीत करण्यात आली. तीत पदाधिकाऱ्यांसह २७ सदस्यांचा समावेश आहे. या समितीला अधिवेशनात मानता देण्यात आली. या २७ सदस्यांची अधिवेशन काळात बैठक झाली. तीत चार पदाधिकारी निवडण्यात आले. अधिवेशनाला किसान सभेचे नेते जयसिंग माळी, अधिकार राष्टीय मंचाचे निमंत्रक दयानंद चव्हाण, अल्पसंख्यांक समितीचे निमंत्रक मासुन मन्यार आदिंनी मनोगत व्यक्त केले. सुनील गायकवाड यांनी आभार मानले.

ठराव असे

जातीयवादी, धर्मांधशक्तीला वेळीच आवर घालावा

किमान वेतनानुसार शेतमजूरांना मजुरी मिळावी

रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवावी

पडीक जमिनीचे वाटप करण्यात यावे  

जिल्हा समिती

अध्यक्ष - सुनील गायकवाड, सचिव - मंगलसिंग चव्हाण, उपाध्यक्ष - चंद्रकांत बर्डे, कोषाध्यक्ष - 

नथू साळवे, सहसचिव - तुळशिराम ठाकरे

टॅग्स