नागीण शिवारात आढळली फरसाणाची पाकिटे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

देवळा -  तालुक्‍यातील वाखारी-दहीवड रस्त्यावरील नागीण शिवारात रस्त्याच्या कडेला ममता फूड्‌स कंपनीची फरसाण पाकिटे कुणीतरी टाकून दिल्याने या परिसरातील नागरिकांत या प्रकारामुळे शंका निर्माण होऊन भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे ही पाकिटे मुदतबाह्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे हे खाद्यपदार्थ ये-जा करणाऱ्या लहान मुलांनी वा जनावरांनी खाल्ल्यास त्यांच्या जीवितास धोका संभवू शकतो. म्हणून याबाबत सखोल तपास व्हावा व असे मुदतबाह्य पदार्थ बेवारसपणे रस्त्यावर न टाकता त्यांची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

दुपारी वाखारी-दहीवड रस्त्यावर नागीण शिवारात फरसाणाची पाकिटे व तशी पॅकिंग असलेल्या गोण्या टाकलेल्या आढळल्याने या परिसरातील नागरिकांनी व प्रवाशांनी विचारणा केली असता कुणी टाकले हे कळू शकले नाही. या पाकिटांवर "ममता फूड्‌स' असा उल्लेख आहे. 500 ग्रॅम वजनाच्या या पाकिटांवर 26 ऑक्‍टोबर 2015 अशी निर्मिती तारीख असली, तरी याच पाकिटांवर 45 दिवसांच्या आत याचा वापर व्हावा, अशी सूचना आहे. याचा अर्थ ही अन्नाची पाकिटे मुदतबाह्य असल्याचे सिद्ध होते. अशा 25-30 गोण्या व मोकळी पाकिटे इतस्तत: पडलेली आहेत.

पाकिटावरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता "या परिसरातील डीलरशी आम्ही बोलतो,' असे सांगण्यात आले व नंतर कोणताही प्रतिसाद देण्याचे त्यांनी टाळले. कारण यापूर्वी याच परिसरात अशाच पद्धतीचे फेकलेले पदार्थ खाल्ल्याने मेंढ्या गतप्राण झाल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारांना पायबंद बसणे गरजेचे आहे.
-योगेश वाघ, पिंपळगाव, ता. देवळा

टॅग्स