जिल्ह्यात शेततळ्यांमुळे वाढली सिंचन क्षमता

जिल्ह्यात शेततळ्यांमुळे वाढली सिंचन क्षमता

जळगाव - यंदाच्या उन्हाळ्यात जाणवलेली पाणीटंचाई, दुष्काळ यामुळे पाण्याचे महत्त्व सर्वांनाच पटले आहे. यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी यंदा आपापल्या शेतात शेततळे करण्यावर भर देऊन शेतातच सिंचन करण्याचे ठरविले होते. यामुळे जिल्ह्यात शेततळ्यांच्या देण्यात उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळ्यांची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. जिल्ह्यात सुमारे ९३२ शेततळे शेतकऱ्यांनी तयार केली आहेत. त्याद्वारे शेतातील विहिरीची पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे.

उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईस सर्वांनाच सामोरे जावे लागले होते. अनेक ग्रामीण भागात दहा ते पंधरा दिवसाआड पाणी मिळत होते अन्‌ तेही अपूर्ण. १२३ गावांमध्ये यंदा टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. पाणी आणि शेतकऱ्यांचे नाते घनिष्ठ आहे. पाण्यावाचून शेती होऊ शकत नाही. यामुळे पावसाचे पडणारे पाणी आपल्याच शेतात जिरविले पाहिजे. पावसाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी आपल्याच शेतात शेततळे करून पाणी जिरवावे अशी अनेक शेतकऱ्यांची इच्छा होती. यामुळे ‘मागेल त्याला शेततळे’ योजना शासनाने सुरु केली.

जिल्ह्यातील स्थिती
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नेमून दिलेल्या आकाराचे शेततळे शेतातच तयार करावे लागते. यासाठी शेतकऱ्यांना पन्नास हजारांचे अनुदानही मिळते. जिल्ह्याला १ हजार ६७१ शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी १ हजार ७५६ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज केले. निकषानुसार १ हजार ५३८ शेतकरी या योजनेसाठी पात्र होते. त्यापैकी १७४ शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले असून त्यांच्या शेतात तळे तयार आहेत. तर उर्वरित ७५८ शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्याचे कार्यादेश देण्यात आले असून काम पूर्ण झाल्यावर त्यांनाही अनुदान देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने सर्वच शेततळे पाण्याने तुडुंब भरले आहे.  अद्याप निम्मा पावसाळा झाला. अजून निम्मा बाकी आहे. पाऊस अजून झाल्यास शेततळे तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी वर्षभर पाणी उपलब्ध राहणार आहे.

नगाव येथे अधिक शेततळे
नगाव (ता.अमळनेर) येथे सुमारे ६६ शेततळे शेतकऱ्यांनी तयार केले आहे. तालुका कृषी अधिकारी भटू पाटील यांनी विशेष प्रयत्न यासाठी केले. त्याद्वारेही पाणी साठा शेतांमध्ये वाढला आहे. ६६ शेतकऱ्यांनी आपल्या शेताभोवती प्रत्येक पन्नास शेवग्याची रोपं लावली आहे. एकूण २५०० शेवग्याची रोपे लावण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com