यावल तालुक्‍यात शेतमजुराची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

डांभुर्णी (ता. यावल) - शेतमजुराने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

डांभुर्णी (ता. यावल) - शेतमजुराने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

उंटावद येथून जवळ असलेल्या शेतात शेतमजूर चंद्रकांत रामराव पाटील (वय 45) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. त्याने आत्महत्येपूर्वी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या आढळल्या आहेत. त्यातील एका चिठ्ठीत, "मी स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करीत असून, यात कुणाचाही संबंध नाही व या शेतकऱ्यालाही कुणी त्रास देऊ नये;' तर दुसऱ्या चिठ्ठीत, उसनवार घेतलेल्या पैशांची यादी आढळून आली आहे. पाटील याच्या मागे पत्नी व अल्पवयीन मुलगा असा परिवार आहे.

Web Title: farmer suicide

टॅग्स