पदवीधर शेतकऱ्याची लहासर येथे आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

जामनेर - लहासर (ता. जामनेर) येथील पदवीधर सागर ऊर्फ किसन पंढरी पाटील (वय 24) या शेतकऱ्याने कर्जफेडीच्या विवंचनेतून स्वतःच्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. मृत सागर पाटील याची सुमारे साडेपाच एकर शेती आहे. आई, वडील, एक बहीण व सागर हा एकुलता असे पाटील कुटुंब. शिक्षणासोबत शेती करीत असताना जवळपास चार लाखांचे कर्ज डोक्‍यावर झाले होते. नापिकी आणि शेतमालाला अत्यल्प भावामुळे तो हे कर्ज फेडू शकत नव्हता. नेहमीप्रमाणे आज सकाळी सागर शेतात गेला होता. सागरची आई शेतामध्ये आल्यावर त्यांना विहिरीच्या बाहेर चपला दिसल्या. त्यामुळे त्यांना शंका आली. त्याचा शोध घेतला असता त्याने विहिरीत आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.