सुरक्षेचे कवच ठरले निव्वळ ‘फुसके गाजर’!

Insurance.
Insurance.

येवला - अवकाळी पाऊस, गारपीट, अवर्षण,दुष्काळ या संकट काळात पीक विमा नक्कीच आधारवड मानला जातो. पण विम्याचे हे कवच केवळ गाजर असून, कंपन्या मालामाल करणारे असल्याने शेतकरी याकडे कानाडोळा करत आहेत. तालुक्यात तर यंदा अद्याप एकानेही पिकाचा विमा उतरवलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. खरिपात पीककर्ज न मिळाल्याने देखील आकडे घटले आहे. हे देखील कारण यामागे आहे.

खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, सुर्यफुल, कारळे, कापूस, कांदा इत्यादी पिक उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक तर कर्जदारांना सक्तीचा आहे.पण विमा भरला, पिकांचे नुकसान झाले मात्र हाती एक कवडीही आली नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला आहे.वर्षानुवर्षे भरलेले पैसे वाया जात असल्याचा अनुभव असल्याने शेतकरी आता याकडे उघडपणे कानाडोळा करत आहेत. पीकविमा केवळ फार्स असून कंपन्या मालामाल करणारा असल्याने शेतकर्यांनी पाठ फिरवत आहे.तालुक्यात विम्याचा लाभ घेऊ शकणारे सभासद सुमारे २४ हजार असून यंदा पिक विमा काढलेले शेतकरी अजूनही शून्य असल्याचे धक्कादायक आकडे आहेत.

जिल्हा बँकां अडचणीत अडकल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात पिककर्ज मिळालेले नाही.याचा पिकविमा योजनेला मोठा फटका बसला आहे.मुळात पिक कर्ज घेतांना कर्जातूनच विम्याची रक्कम कपात केली जाते,पण कर्जच नाही म्हणून विमा नसल्याचे चित्र आहे.तर इतरानी विम्याचे कवच घेऊनही कधी नुकसान भरपाई मिळालीच नाही म्हणून याकडे कानाडोळा केल्याने खरीप पिकांचे संरक्षणाचे कवच कवडीमोल ठरत आहे.

जिल्हायातुनच होतोय कानाडोळा...
२०१६ मध्ये जिल्ह्यातील ८९ हजार ३३६ शेतकऱ्यांनी पिकविमा घेतला होता.त्यापैकी १ हजार ६४१ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला.तर २०१७ मध्ये जिल्ह्यात ७ लाख ९७ हजार ६९७ खातेदार शेतकरी असून यापैकी केवळ ४ हजार ६४२ शेतकऱ्यांनीच पिक विम्याचा लाभ घेतला आहे.म्हणजेच ७ लाख ९३ हजार शेतकर्यांनी याकडे पाठ फिरवली होती.यंदाचे आकडे तर अधिकच गंभीर राहणार असेच चित्र आहे.

“पिकविमा काढला तरी जाचक अटी दाखवून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले जाते म्हणून  शेतकऱ्यांमध्ये उदासिनता आहे.पिकविमा एजंटची गावोगाव नियुक्ती केल्यास सर्व शेतकर्‍यांना पिक विमा संकल्पना समजेल. नुकसान भरपाई देताना अटी शिथील करणे गरजेचे आहे.”
बापूसाहेब पगारे, शेतकरी संघटना नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com