अनुदानाच्या लाभासाठी बाजार समितीतच विका शेतमाल

yeola
yeola

येवला : बाजार समिती संचालक मंडळ शेतकरी हिताची विकासाची कामे करीत असुन गत आर्थिक वर्षात बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेतमालाचा फरक,अनुदान दिल्यास त्याचा लाभ मिळवण्यासाठी बाजार समितीतच शेतमाल विक्री करा असे आवाहन बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे यांनी केले.

कृषि उत्पन्न बाजार समितीचच्या आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून सभापती शिंदे बोलत होत्या. बाजार समितीचे प्रभारी सचिव के.आर. व्यापारे यांनी आर्थिक पत्रकांचे व वार्षिक अहवालाचे सविस्तर वाचन करुन माहिती दिली.

लासलगांव, पिंपळगांव बाजार समित्यांप्रमाणेच येथे टोमॅटोसाठी सौदा पध्दत सुरु केली आहे.शेतकरी बांधवांनी शेतीमाल खाजगी व्यापा-यांना विक्री न करता बाजार समिती मध्येच विक्री करावा तसेच कांदा लिलावात ट्रॅक्टरचे फाळके पाडतांना माल खराब होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी केले.येवला, अंदरसुल व पाटोदा येथे 4 कोटी 29 लाख रकमेची विकासकामे पुर्ण झाली असून येवला येथे रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण,वजनकाटा कॅबीन,अंदरसुल येथे मिटींग हॉलचे बांधकाम,पाटोदा येथे प्रवेशव्दाराचे बांधकाम होणार असल्याचे सभापती शिंदेनी सांगितले.

माजी सभापती अरुण काळे,संचालक संतु पा. झांबरे,राधाकिसन सोनवणे यांनी कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. उपसभापती गणपत कांदळकर यांनी आभार मानले. सभेला संचालक संजय बनकर, कृष्णराव गुंड, नवनाथ काळे, अशोक मेंगाणे, मोहन शेलार, मकरंद सोनवणे, भास्कर कोंढरे, कांतीलाल साळवे, धोंडीराम कदम, प्रमोद पाटील, सुभाष समदडीया, नंदकिशोर आट्टल, पुष्पा शेळके, मनिषा जगताप, राधाबाई गायकवाड, बंडु क्षिरसागर, मंगेश भगत, गोरख सुराशे, साहेबराव सैद, एकनाथ साताळकर, तसेच दिनेश आव्हाड, नम्रता जगताप, भागुनाथ उशीर, वसंत पवार, देविदास शेळके, शिवाजी वडाळकर, दिपक जगताप, अशोक शहा, अनिल मुथा, बाळु गायकवाड, डी.सी.खैरनार, बी.ए.आहेर, एस.टी.ठोक,एस. जे.जाधव, बी.डी.गायकवाड, आर.व्ही.बोडके, अनिल कांगणे आदि उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com