संपाबाबत आंदोलक शेतकरी आज घेणार निर्णय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

नाशिक : मुंबईतील निर्णयावर समाधानी नसलेले शेतकरी व त्यांच्या अनेक संघटना संपाबाबत ठाम आहेत. संप सुरूच ठेवण्यासाठी ठाम असलेल्या शेतकऱ्यांची नाशिकला बाजार समितीत बैठक होऊन त्यात संपाबाबत सर्वसहमतीने आज (रविवार) दुपारी चारला एकमताने निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार, मागण्या मान्य झाल्याशिवाय  माघार घ्यायला तयार नसलेल्या राज्यातील सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उद्या नाशिकला दाखल होत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून पालकमंत्री गिरीश 
महाजन हेही मध्यस्थीसाठी नाशिकला दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेत संप मागे घेतल्याचे कळताच, सकाळपासून नाशिकला शेतकरी संपाच्या घडामोडी गतिमान झाल्या. पूर्ण 
मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, अशी ठाम भूमिका असलेले शेतकरी पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जमले. त्याचवेळी काही व्यापारी त्यांचा माल विक्री करीत असल्याचे लक्षात येताच, आंदोलकांनी संप मागे घेतला नसताना विक्री कशी, असा प्रश्‍न उपस्थित करीत विरोध केला. अशातच काही आंदोलकांनी विक्रीला आणलेले डांगर फेकून दिले. तेथे पूर्ण मागण्याशिवाय संप मागे न घेण्याच्या घोषणा देत बैठक झाली.

'शेतकरी संपा'विषयी अधिक बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

भाजप नेत्यांची माघार
संप कायम ठेवण्याबाबत बैठक सुरू असतानाच भाजपचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयांनी फरांदे, माजी आमदार वसंत गिते आदींसह भाजप पदाधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी आंदोलकांशी चर्चेचा प्रयत्न केला. मात्र, संप कायम ठेवण्याचा निर्णय झाला असून, उद्याच यावर सर्वसहमतीने निर्णय होईल, असे सांगत चर्चेला नकार दर्शविला.