yeola
yeola

२५ वर्षांनंतर भूमिपुत्र आमदारांचा सत्काराचा योग

येवला - या मतदारसंघाला दराडे बंधुमुळे आता तीन आमदार लाभले आहे.२५ वर्षांनंतर भूमिपुत्र आमदारांचा सत्काराचा योग यामुळे आला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी केले.दराडे बंधू हे सत्ताधारी पक्षात असल्याने मतदारसंघातील कामे मार्गी लावतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने आयोजित आमदार नरेंद्र दराडे व शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा भव्य सत्कार समारंभात शिंदे बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे युवा नेते संभाजीराजे पवार, पंचायत समितीच्या सभापती नम्रता जगताप, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, युवा नेते कुणाल दराडे, संघाचे अध्यक्ष दिनेश आव्हाड, उपाध्यक्ष भागूजी महाले, डॉ.सुधीर जाधव, कांतिलाल साळवे, नितीन काबरा, बबनराव साळवे, संजय कासार, सर्जेराव सावंत, देविदास निकम आदी उपस्थित होते.

यावेळी दराडे बंधुना घोडा व बैलगाडीची प्रतिमा देऊन भव्य सत्कार संघाच्या वतीने करण्यात आला.ध्यानीमनी नसतांना आमदारकी खेचून आणली. यासाठी माणिकराव शिंदे यांनी बळ मिळाल्याचे आमदार किशोर दराडे म्हणाले.

संघ बिनविरोध झाला तश्याच सर्व निवडणूका बिनविरोध होऊ शकतील. तालुक्याने मनावर घेतले तर पाच आमदार मिळून येवला राज्यात चर्चेला येईल असेही दराडे म्हणाले. एकोप्याने संघाची वाटचाल सुरुय असल्याने प्रगती होतेय.शासन दरबारी पाठपुरावा करून संघाला निधी, गोडावून मिळवून देऊ.तालुक्याला वरदान ठरणारा मांजरपाडा व दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे प्रलंबित कामे पूर्ण करून घेण्यासह कालव्याच्या अस्तरीकरणाला १७० कोटीचा निधी मिळवण्यासाठी शासनाकडे आग्रह धरणार असल्याचे आमदार नरेंद्र दराडे यांनी यावेळी सांगितले. विधानपरिषद निवडणुकीत मी पक्ष नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपल्या उमेदवाराला निवडणूक सोपी नाही हे अगोदरच सांगितले होते. आता माझ्यावर ब्लेम करणाऱ्याना हे माहीतच नाही असा खुलासा शिंदे यांनी केला. दराडे बंधूंच्या निवडणुकीतील मेहनतीने व नियोजनाने दोन्ही विजय होऊ शकले आहे.दसऱ्यानंतर येथे या दोघांचा नागरी सत्कार करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.यावेळी शेतकरी नेते संतू पा.झांबरे, कुणाल दराडे, संजय बनकर, संचालक भागूनाथ उशीर यांनीही मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन दत्तात्रय वैद्य यांनी केले तर अध्यक्ष दिनेश आव्हाड यांनी आभार मानले.संचालक राजेंद्र गायकवाड, जनार्दन खिल्लारे, नाना शेळके, संतोष लभडे, त्रंबक सोमासे, भास्कर येवले, अनिल सोनवणे, रघुनाथ पानसरे, सुरेश कदम, दत्तात्रय आहेर, दगडू टर्ले, शिवाजी धनगे, रामदास पवार, जगन्नाथ बोराडे, व्यवस्थापक बाबासाहेब जाधव तसेच एकनाथ वाघ, रामभाऊ केदार, लक्ष्मण घुगे, दत्तात्रय दराडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com