येवला- कर्करोग पिडीत रुग्णाच्या उपचारांसाठी लाखमोलाची आर्थिक मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

आम्ही नेहमीच राजकारणाला कमी अन समाजकारणाला अधिक महत्व दिले आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल,गोरगरीब , पीडितांना मदतीचा हात नेहमी द्यायचा हे ठरवीले आहे. आपल्या मदतीने कुणाचा संसार उभा राहत असेल,कुणाला आधार मिळत असेल तर अशा ठिकाणी मदत करण्यात आम्हाला समाधान मिळते. सावंत यांना याच भावनेतून मदत केली असून मनस्वी समाधान आहे.
- रुपचंद भागवत ,उपसभापती,पं. स.येवला

येवला : हॉस्पिटलचा खर्च म्हटला की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात कर्करोगासारखा आजार म्हटला कि विचारायलाच नको. पिंपळखुटे बुद्रुक येथील श्रीरंग सावंत यांच्यावर असाच प्रसंग ओढवला. उपचारासाठी एक दमडी जवळ नसल्याने चिंता वाढली. मात्र अशा आपत्तीत त्यांच्या मदतीला पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत धावून आले आहे. तातडीने उपचार व्हावे यासाठी भागवत यांनी रोख अकरा हजाराची मदत त्यांना देऊन मदतीला धावून गेले आहे.

अनेकांच्या आयुष्यात ओढवलेल्या संकटाच्या वेळेत भागवत बंधूची धावून जाण्याचा मनाचा मोठेपणा नक्कीच कौतुकाचा आहे. अनेकदा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना, पीडितांना आर्थिक मदत देऊन भागवत संकटकाळात धावून गेले आहेत. पिंपळखुटे बुद्रुक येथील श्रीरंग सावंत यांना कमरेखाली गाठ होऊन कर्करोग झाल्याने नगरकर हॉस्पिटल येथे सावंत यांच्यावर मोठा खर्च करून शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र आता केमोचे इंजेक्शनसाठी येणारा खर्च आवाक्याबाहेर असल्याने कोरडवाहू शेतीवरच कुटुंबाची उपजीविका असल्याने गरीब असलेल्या सावंतावर संकट ओढवले आहे.

सावंत यांना केमोचे इंजेक्शन घेण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता असल्याचे कळताच उपसभापती भागवत यांनी ताबडतोब त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. केमोचे पुढील इंजेक्शनसाठी नारायणगिरी महाराज (नाम) फाउंडेशन नाशिकचे अध्यक्ष विष्णु भागवत यांचेमार्फत उपसभापती रूपचंद भागवत यांनी ११ हजार रुपयांची तातडीची मदत दिली. भागवत यांनी केलेल्या मदतीमुळे श्रीरंग सावंत यांना केमोचे इंजेक्शन घेणे आता शक्य होणार आहे. यावेळी सावंत व त्यांचे कुटुंबीय तसेच पिंपळखुटे येथील ग्रामस्थांनी भागवत बंधुचे आभार मानले. यावेळी पत्नी अलका सावंत, बंधु देवाजी सावंत,विलास भागवत,ज्ञानेश्वर भागवत,मनोज भागवत, शरद रोठे, अरूण पुणे, तुकाराम सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: financial help for cancer patient