शिंपी समाजाकडून अश्विनीला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत

Financial help of Rs 5000 to Ashwini from Shimpy Community
Financial help of Rs 5000 to Ashwini from Shimpy Community

सटाणा : अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवून तालुक्यात मोठे यश मिळविणाऱ्या अश्विनी अहिरराव हिच्या शिक्षणाची तळमळ बघून सर्वच स्तरातून तिला मदतीचा ओघ सुरु झाला आहे. सटाणा शहर शिंपी समाजातर्फे आज रविवार (ता.१७) रोजी अश्विनीला रोख पाच हजार रुपयांची भरीव मदत देण्यात आली असून अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेच्या शैक्षणिक दत्तक योजनेद्वारे तिच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरु झाला आहे.

येथील श्री संत नामदेव महाराज मंदिरामध्ये दहावीत यश मिळविलेल्या शिंपी समाजातील अश्विनी अहिरराव हिच्या गुणगौरव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र बागुल तर प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष शशिकांत सोनवणे, नाशिक जिल्हा महिला उपाध्यक्षा सुरेखा तरटे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निकुंभ, शहर महिलाध्यक्षा कामिनी निकुंभ आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मध्यवर्ती संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र बागुल म्हणाले, कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी त्रास सहन करण्याची क्षमता, अपयशावर मात करण्याची जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. 

अश्विनीने स्पर्धेच्या काळात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळविलेले यश आजच्या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. मध्यवर्ती संस्थेच्या शैक्षणिक दत्तक योजनेद्वारे तिच्या पुढील शिक्षणासाठी भरघोस मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही बागुल यांनी स्पष्ट केले. यावेळी समाजातर्फे अश्विनीचा रोख पाच हजार रुपये व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य मोहन कापडणीस, शहर उपाध्यक्ष नितीन बिरारी, सटाणा शहर युवाध्यक्ष संदीप सोनवणे, माजी अध्यक्ष दिलीप खैरनार, मीनाताई बागुल, ज्योती चव्हाण, सुलोचना कापुरे, संजय खैरनार, रमण अहिरराव, खंडेराव जाधव, मुकुंद अहिरराव, शरद कापुरे, प्रकाश खैरनार, रोशन खैरनार, आर. आर. निकुंभ, राजेंद्र साळवे, संदीप अहिरराव व इतर समाज बांधव युवक व महिला वर्ग उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com