समोरा-समोरील अपघातात ट्रक पेटला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

नागपूर-सुरत महामार्गावरील साक्री धुळे रस्त्यावरील इच्छापूर गावाजवळ मध्यरात्री बारा ते साडे बाराच्या दरम्यान दोन ट्रक समोर अपघात झाल्याची घटना घडली.

जळगाव - साक्री-धुळे रस्त्यावरील इच्छापूर गावाजवळ दोन ट्रकांचा समोरा समोर अपघात मध्यरात्री झाला. ही घटनेत एका ट्रकने पेट घेतल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक काही वेळासाठी थांबली होती. 

नागपूर-सुरत महामार्गावरील साक्री धुळे रस्त्यावरील इच्छापूर गावाजवळ मध्यरात्री बारा ते साडे बाराच्या दरम्यान दोन ट्रक समोर अपघात झाल्याची घटना घडली. घटनेत एका ट्रक मधील चालक व क्‍लीनर अपघात घडल्यावर फरार झाले. तर दुसऱ्या ट्रक मधील चालक ट्रकच्या स्टेरींग मध्ये अडकला होता. इच्छापूर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकमधील अडकलेल्या चालकास त्वरित बाहेर काढले. त्यानंतर ट्रकने पेट घेतल्यावर ग्रामस्थांनी आग विझविली. या घटनेमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळित झाली होती.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: fire broke out in the accident to truck