ऑनलाइन धान्य वितरणात नाशिक प्रथम 

ऑनलाइन धान्य वितरणात नाशिक प्रथम 

नाशिक - सार्वजनिक धान्य गैरव्यवहारामुळे बदनाम झालेल्या नाशिक जिल्ह्यात पुरवठा विभागाने ऑनलाइन कामातून पारदर्शकता आणण्यासाठी उपाययोजना करत गतीने बदल सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, आदिवासी तालुक्‍यांमध्ये "रेंज'च्या खोळंब्यावर पाय रोवून उभे राहून मात करण्यात यंत्रणेला यश मिळाले. त्याचाच परिपाक म्हणजे, पॉइंट ऑफ सेल (पॉस) यंत्राद्वारे धान्य वितरणात जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. 

कोल्हापूर दुसऱ्या, तर नगर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर, कळवण, दिंडोरी या आदिवासी बहुल तालुक्‍यासह नाशिक तालुक्‍यातील पश्‍चिमेच्या 32 गावात इंटरनेटची रेंज मिळत नाही. अनेक वाड्या-पाड्यावर दूरपर्यंत जाऊनही रेंज मिळत नसल्याने अशा भागात अडचणी कायम आहेत. अशाही परिस्थितीत ऑनलाइन धान्य वितरणात नाशिकचे हे साध्य केले आहे. सुरगाणा धान्य गैरव्यवहार राज्यभर गाजला होता. त्यानंतर सावध झालेल्या पुरवठा विभागाने गोदामात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. धान्य वितरणाच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवत ऑनलाइन ट्रॅकिंग करण्यास सुरवात झाली. पुढचा टप्पा म्हणून थेट ग्राहकांपर्यंत ऑनलाइन पद्धतीने धान्य पोचवण्यात येत आहे. 

70 टक्के कामकाज 
ऑनलाइन कामकाजाचा टप्पा गाठताना प्रशासनाने आतापर्यंत 70 टक्के यश मिळविले आहे. जिल्ह्यात 7 लाख 56 हजार शिधापत्रिका आहेत. त्यापैकी 30 मेपर्यंत 4 लाख 93 हजारांहून अधिक शिधापत्रिका ऑनलाइन जोडल्या आहेत. कालपर्यंत (ता. 31) 5 लाखांपर्यंत शिधापत्रिका ऑनलाइन जोडण्याचे कामकाज पूर्णत्वास गेले. तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आदिवासी भागात न पोचणाऱ्या धान्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी "घरपोच धान्य' ही मोहीम राबवली होती. तिला मिळालेले यश पाहून राज्य सरकारने त्या वेळी घरपोच धान्य पोच हा नाशिक पॅटर्न राज्यभर लागू केला होता. 

ऑनलाइन धान्य वितरणातील  "टॉप फाइव्ह' जिल्हे 
जिल्हा ऑनलाइन शिधापत्रिका संख्या 

नाशिक 4 लाख 93 हजार 834 
कोल्हापूर 4 लाख 91 हजार 298 
नगर 4 लाख 50 हजार 371 
नांदेड 4 लाख 24 हजार 589 
ठाणे 4 लाख 9 हजार 988

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com