धुऴे : घर जळून खाक, पाच जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

मृतांमध्ये शोभाबाई शर्मा (62), राम शर्मा (45), जयश्री राम शर्मा (35), साई राम शर्मा (12) आणि राधे राम शर्मा (10) यांचा समावेश आहे.

धुळे - वर्दळीच्या पाचकंदिल परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर पावणेदोनला घराला शाॅर्टसर्किटने आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली. 

राम शर्मा यांच्या शिवाजी मार्केट/ अकबर चौकाजवळील धनादाळ नामक बोळीत असलेल्या घराला आग लागली. आगीवर तासानंतर नियंत्रण मिळवण्यात मनपा पथकाला यश आले. तोपर्यंत घरात अडकून पडलेल्या पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. या दुमजली व बहुतांशी लाकडाच्या घराच्या पहिल्या मजल्याला आग लागली. मात्र दुसऱ्या मजल्यावर झोपेत असलेल्या पाच जणांना बाहेर पडता न आल्याने ही घटना घडली.

शर्मा यांच्या साधारण: १० बाय १५ च्या दोन रूम होत्या. अशा दुमजली घरास ये-जासाठी एकच दरवाजा होता. त्यांनी वाचवा वाचवा अशी आरडाआेरड केली, पण मदतीला कोणा जाऊ शकले नाही. राम शर्मा हे पाचकंदिल परिसरातील उसगल्लीमधील दक्षिणमुखी मारुती मंदीराचे पुजारी होते. आज रविवारी शनि प्रदोष असल्याने शनिवारी रात्री त्यांनी मंदिराची सजावट केली होती.

मृतांमध्ये शोभाबाई शर्मा (62), राम शर्मा (45), जयश्री राम शर्मा (35), साई राम शर्मा (12) आणि राधे राम शर्मा (10) यांचा समावेश आहे.

टॅग्स