जिल्ह्यात तीन अपघातांत चार ठार; सहा जण जखमी

जिल्ह्यात तीन अपघातांत चार ठार; सहा जण जखमी

फत्तेपूर (ता. जामनेर)/ पारोळा - जिल्ह्यात आज तीन वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यू झाला; तर एकूण सहा जण जखमी झाले. चिंचोली-पिंप्रीजवळ दुपारी एकला दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर तीन जण जखमी झाले. मृतांत दोन्ही मोटारसायकलचे चालक आहेत. दुसऱ्या घटनेत महामार्गावर पारोळ्याजवळील कन्हेर फाट्यावर ओमनी व्हॅन आणि बसच्या अपघातात ओमनीचालक ठार झाला; तर एक महिला जखमी झाली. तिसऱ्या घटनेत अमळनेर-धरणगाव रस्‍त्‍यावर कुऱ्हे गावाजवळ दोन मोटारसायकलच्‍या अपघातात एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत.

मोटारसायकल अपघात 

चिंचोली पिंप्री गावाहून हिंगणे पिंप्री येथील रहिवासी जितेंद्र शिवसिंग पाटील (वय ३८) व डिगंबर हिलालसिंग पाटील (वय ३५) हे दोघे सख्खे चुलत भाऊ फत्तेपूरकडे मोटारसायकलने (एमएच १९ सीबी ४१४८) निघाले. दरम्यान फत्तेपूरहून जामठी (ता. बोदवड) येथे जाणारे प्रकाश रामभाऊ साबणे (वय ४०) व कडू गोंदू खरात (वय ५०) आणि आणखी एक जण असे तिघे (एमएच १९ डी ११९९) मोटारसायकलने जात असताना दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक बसली. यात जितेंद्र पाटील (रा. हिंगणे), प्रकाश साबणे (रा. जामठी) हे जागीच ठार झाले. यातील तीनही जखमींना फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉ. पराग पवार यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविले आहे.

बस- ओमनी अपघात 

महामार्ग क्रमांक सहावर पारोळ्याकडून जळगावकडे जाणारी धुळे- जळगाव बस (एमएच१४बीटी२०४२) व एरंडोलकडून पारोळ्याकडे येणारी ओमनी (एमएच१९बीजे५४५७) यांच्यात समोरासमोर धडक झाली. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. यात ओमनीचालक राकेश राजेंद्र वराडे (वय २२, रा. मोठा माळीवाडा, धरणगाव) हा जागीच ठार झाला, तर सपना महाजन (रा. धरणगाव) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. याबाबत बसचालक शिवाजी देनीराम बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राकेश वराडेविरुद्ध ओव्हरटेक करून बसला धडक दिल्याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे. बस व ओमनीच्या धडकेत बसने ओमनीला सुमारे शंभर फूट फरपटत नेऊन दोन्ही वाहने ही रस्त्याच्या कडेला नाल्यात उतरले होते. दोन्ही वाहने भरधाव वेगाने असल्याने मृत राकेशला ओमनीतून अक्षरशः बाहेर ओढून काढले. हवालदार रवींद्र रावते तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com