जिल्ह्यात चार हजार कर्जदारांना वसुलीच्या नोटिसा 

जिल्ह्यात चार हजार कर्जदारांना वसुलीच्या नोटिसा 

जळगाव - जिल्ह्यातील 118 पतसंस्थांच्या थकीत कर्जदारांकडून वसुलीसाठीच्या कृती आराखड्यानुसार (ऍक्‍शन प्लॅन) सुमारे चार हजारांवर कर्जदारांकडून कर्जवसुलीचे आदेश वजा नोटीस बजावण्याचे जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी आज दिले. या कर्जवसुलीसाठी 180 वसुली अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

डिसेंबरमध्ये सहकार आयुक्तांनी ठरवून दिलेल्या वसुलीच्या कृती आराखड्यानुसार आज पतसंस्थांच्या कर्जदाराकडून वसुलीसाठी सुमारे 180 वसुली अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पतसंस्थांच्या कर्जदारांकडून वसुलीसाठी सुमारे चार हजारांवर दाखले देण्यात आले आहेत. यामुळे कर्जदारांकडून वसुलीला गती येणार आहे. 

मार्चअखेर पतसंस्था अडचणीतून बाहेर 
जिल्ह्यात नऊ तालुक्‍यांतील पतसंस्थांच्या वसुली अधिकारी, अवसायक, प्रशासक, व्यवस्थापक, सहाय्यक निबंधकांची आज वसुली आढावा बैठक जिल्हा उपनिबंधक जाधवर यांनी घेतली. प्रत्येक तालुक्‍यातील पतसंस्थानिहाय कर्जदारांकडून वसुलीचा आढावा घेण्यात आला. यावल, भुसावळ, जळगाव तालुक्‍यातील काही पतसंस्था मार्चअखेर अडचणींतून बाहेर येणार असल्याचे वसुलीवरून स्पष्ट होत असल्याचे श्री. जाधवर यांनी सांगितले. 

..तर फौजदारी कारवाई 
वसुली मोहिमेस जे संस्थाचालक सहकार्य करीत नसतील अशांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. सोबतच संचालक मंडळ का बरखास्त करू नये? अशा आशयाच्या नोटिसा सहकार्य न करणाऱ्या अनेक संस्थाचालकांना देण्यात आल्या आहेत. 

दोन कोटींची शासन वसुली 
पतसंस्थांना शासनाने दिलेल्या मदतीपैकी एक कोटी नव्वद लाख रुपये पतसंस्थांकडून वसुली करून शासनाला दिले आहेत. पतसंस्थांना शासनाचे 63 कोटी रुपये देणे बाकी आहे. 

व्याजदर जाहीर होणार 
पतसंस्थांची वसुली होण्यासाठी "वनटाइम सेटलमेंट' मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात ऑडिट विभागातून या सेटलमेंटमध्ये किती व्याजदर ठेवायचा. तो नक्कीच कमी असेल. यामुळे कर्जदार कर्ज भरून मोकळे होतील. हा दर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 98 पतसंस्थांचा "कॉस्ट ऑफ फंड' काढण्यात आला आहे. 

बढे पतसंस्थेच्या मालमत्तेचा ई-लिलाव 
सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या संचालकांकडून वसुलीसाठी पतसंस्थेच्या पंढरपूर येथील मालमत्तेचा ई-लिलाव लावण्यात आला आहे. सात मार्चला लिलावात सहभागी होण्याची अंतिम तारीख आहे. या मालमत्तेची आधारभूत किंमत पंधरा कोटी रुपये आहे. ही रक्कम आल्यास मोठी वसुली होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com