वीरपत्नींना 1 मेपासून मोफत एसटी प्रवास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नाशिक - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत वीरपत्नींना मोफत एसटी प्रवासाची सुरवात 1 मेपासून होणार आहे. नाशिकमध्ये पाच वीरपत्नींना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत प्रवासाचा पास देऊन या योजनेचा प्रारंभ केला जाईल.

सैन्यदलातील व सुरक्षा बलातील कर्तव्यावर वीरमरण आलेल्या जवानांच्या पत्नींना मोफत एसटी प्रवास राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास उपलब्ध व्हावा, यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा केली होती.

राज्यभरातील वीरपत्नींना त्यानिमित्ताने मोफत प्रवास उपलब्ध होईल. नाशिकमधील पाच वीरपत्नींनी मंगळवारी (ता. 1) समारंभपूर्वक पासचे वितरण होईल. त्यानंतर इतर वीरपत्नींच्या घरी स्वतः अधिकारी जाऊन पास देणार आहेत, असे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी सांगितले.

Web Title: free st journey martyr jawan wife