फनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पन भुजबळांच्या हस्ते व्हावे

Funicular trolley inauguration can be the hands of Bhujbal
Funicular trolley inauguration can be the hands of Bhujbal

वणी : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांनी सप्तश्रृंगी गडावर साकारलेला देशातील पहिल्या फ्युनिक्यलर ट्रॉलीचा प्रकल्प पूर्णत्वास जावूनही गेल्या चार महिन्यांपासून 'लाल फितीत' अडकला आहे. दरम्यान तुरुंगातून सुटल्यानंतर प्रथमच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले छगन भुजबळ उद्या, ता. १७ रोजी आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तश्रृंगी गडावर आहेत. याचवेळी फनिक्युलर ट्रॉलीचे उद्घाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते व्हावे यासाठी कार्यकर्ते आग्रही राहाणार असल्याची चर्चा आहे. 

आद्य शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. स्वयंभू  असलेल्या आदिमायेचे मंदीरात दर्शनासाठी जाण्यासाठी ५५१ पायऱ्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अपंग, वृद्ध, लहान बालकांना दर्शन घेणे मोठे जिकिरीचे ठरते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेले छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने प्रकल्पास मंजुरी मिळून फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रकल्पाचे कंत्राट सुयोग बक्षानी फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रा. लि. या कंपनीने घेतले होते. या १५ ऑगस्ट २००९ साली प्रकल्पाचे भुमीपूजन छगन भुजबळ यांच्या हस्ते होवून सुरु झालेले काम अनेक अडीअडचणींवर मात करत नऊ वर्षांच्या कालावधीनंतर एकदाचे पुर्ण झाले, आणि भाविकांची फनिक्युलर ट्रॉलीची प्रतिक्षा संपली. 

मात्र तांत्रिका बाबींची अपूर्णता तसेच मुख्यमंत्र्यांचे उद्घाटनासाठी रद्द झालेले संभाव्य दौरे यामूळे गेल्या चार महिन्यांपासून फनिक्युलर टॉलीचा उद्घाटन सोहळा लांबणीवर पडला आहे. त्यामूळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत असतांनाच फॅनिक्युलर ट्रॉली प्रकल्प ज्यांच्या हातून सुरु झाला असे छगन भुजबळ उद्या, ता. १७ रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी येत असून याचवेळी फनिक्युलर ट्रॉली प्रकल्पाचे भुमिपूजन छगन भुजबळ यांनीच प्रकल्पाचे लोकार्पन करुन भाविकांना ट्रॉलीची सेवा सुरु करुन द्यावी यासाठी आग्रही राहाणार असल्याची चर्चा आहे. 


ट्रॉलीचे उद्घाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते व्हावे यासाठी ग्रामपंचायतने ठराव केला आहे. राजेश गवळी, उपसरपंच सप्तश्रृंगी गडमाजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या कल्पनेने व प्रयत्नेने फनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भुमिपूजन भुजबळ साहेबांनीच केले असून त्यांच्याच हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन व्हावे ही कार्यकर्त्यांबरोबरच भाविकही आग्रही आहेत.
 बाळासाहेब व्हरगळ, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शांताराम सदगीर, संघटक राष्ट्रवादी काँग्रेस कळवण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com