मेहुणबारे पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

दीपक कच्छवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

खानदेशात 'अक्षय तृतीया' अर्थात 'आखाजी'च्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जातो. ग्रामीण भागात जुगार खेळणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. 

मेहुणबारे (ता : चाळीसगाव) : धामणगाव(ता. चाळीसगाव) येथील  जुगार अड्ड्यावर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास  मेहुणबारे पोलिसांनी अचानक  छापा टाकत रोख रकमेसह जुगाराचे साहीत्य,जप्त करून  नऊ जणांना  ताब्यात घेतले आहे. 

खानदेशात 'अक्षय तृतीया' अर्थात 'आखाजी'च्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जातो. ग्रामीण भागात जुगार खेळणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. 

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आखाजी सणाचे औचित्य साधत जुगार प्रेमींमध्ये वाढ झाली. गावोगावी जुगाराची जत्राच भरत आहे. धामणगाव (ता. चाळीसगाव) येथे जुगार आड्डा चालत असल्याची गुप्त माहिती मेहुणबारे पोलिसांना मिळाली. आज दुपारी तीनच्या सुमारास मेहुणबारे पोलिसांनी धामणगाव येथे जुगार आड्यावर छापा टाकला या छाप्यात गोपीचंद पवार, पद्माकर पिंगळे, निंबाजी जगताप, कैलास पाटील, दिलीप पवार, निलेश मोरे, विठ्ठल कोळी , संजय मोरे यांना रंगेहाथ पकडले.

या कारवाईत मुद्देमाल रोख दोन हजार चारशे रुपये व काल जामदा (ता. चाळीसगाव) येथे 20 हजार रूपये असे दोन दिवसात 22 हजार 400 रूपये रोख जप्त केले. धामणगाव येथील कारवाई साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कैलास पाटील, गोरक चकोर, सिध्दांत शिसोदे यांनी केली.

Web Title: gambler arrested in chalisgaon