निजामपूरला अवतरला 'गणपतीच्या आकारातील टोमॅटो' 

Ganapati-shaped tomatoes in Nizampur
Ganapati-shaped tomatoes in Nizampur

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील नवआदर्श गणेश मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बिहारीलाल शाह यांना रविवारी (ता.16) सायंकाळी पाचच्या सुमारास गल्लीतच भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या हातगाडीधारकाकडून टमाटे खरेदी करताना श्री गणेशाच्या आकाराचा टोमॅटो आढळून आल्याने बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

त्यानंतर राजेंद्र शाह यांनी निसर्गाच्या या चमत्कारास मनोभावे नमन केले. सदर गणेशरूपी टोमॅटोला पूजाविधी करून पेशवेकालीन गणपती मंदिरात गणेशमूर्तीजवळ ठेवले असून मंदिरात यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. नेमका गणेशोत्सव काळातच 'गणेशरूपी टोमॅटो' अवतरल्याने नतमस्तक होण्यासाठी भाविकांचीही तोबा गर्दी उसळली होती. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रभाई शाह व त्रिलोक दवे यांनी 'सकाळ'शी संपर्क साधून ही माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com