निजामपूर: शालेय वक्तृत्व स्पर्धेत गायत्री धनगर प्रथम!

jaitane
jaitane

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत संचालक कै.राजेश्वरबुवा उपासनी यांच्या स्मृतिनिमित्त आज (ता.21) सकाळी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. तीत बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी गायत्री आबा धनगर हिने प्रथम क्रमांक पटकावला. "इंटरनेटच्या अतिवापरामुळे अफवांचे फुटलेले पेव!" हा वक्तृत्व स्पर्धेचा ज्वलंत विषय होता.

सर्वप्रथम उपमुख्याध्यापक प्रा.राजेंद्र चौधरी, स्पर्धेचे परीक्षक तथा माजी उपप्राचार्य प्रा.एस.के.वाणी, आदर्श महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा.यशवंत कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक प्रा.रामचंद्र सोंजे, प्रा.पंडित जाधव आदींच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. स्व.राजेश्वरबुवा उपासनी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. वक्तृत्व व वादविवाद समितीतर्फे परिक्षकांचा सत्कार झाला.

नववी ते बारावीच्या एकूण 10 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात गायत्री धनगर, पवन कारंडे, जयश्री गवळे, किशोरी भदाणे, साक्षी पगारे, क्रांती बागुल, सुमिता पगारे, शीतल बेडसे, प्रणव बच्छाव, तेजल कुलकर्णी आदींचा समावेश होता. त्यात बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी गायत्री आबा धनगर हिने प्रथम, बारावी कला शाखेचा विद्यार्थी पवन अर्जुन कारंडे व अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी जयश्री सतीश गवळे यांनी विभागून द्वितीय, तर नववीची विद्यार्थिनी किशोरी अनिल भदाणे हिने तृतीय क्रमांक पटकावला.

सेवानिवृत्त शिक्षक प्रा.एस.के.वाणी, प्रा.यशवंत कुलकर्णी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले व मनोगत व्यक्त केले. प्रा.दिनेश तोरवणे यांनी गुणसंकलन केले. प्रा.पंडित जाधव यांनी वेळाधिकारी म्हणून काम पाहिले. उपमुख्याध्यापक प्रा.राजेंद्र चौधरी यांनी निकाल जाहीर केला. वक्तृत्व व वादविवाद समितीचे प्रमुख प्रा.भगवान जगदाळे यांनी प्रास्ताविक, परिचय व सूत्रसंचालन केले. तर समिती सदस्या प्रा.राजश्री पाटील यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com