हे सरकार शेटजी, भटजींचे - आमदार गावित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

काँग्रेस बालेकिल्ला राखण्यासाठी सज्ज; मेळाव्यात नव्या पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती

घोटी - राज्यातील भाजपप्रणीत शासनाने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे नसून शेटजी- भटजींचे आहे. त्यांची धोरणे संबंधितानांच पूरक आहेत. निव्वळ शासन निर्णय काढून सरकार चालत नाही, त्याची अंमलबजावणी सर्वसामान्य जनतेला फायद्याची झाली पाहिजे. इगतपुरी तालुका हा कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहील, असे प्रतिपादन आमदार निर्मला गावित यांनी केले.

वैतारणा येथे झालेल्या काँग्रेस मेळाव्याप्रसंगी त्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की या शासनाच्या प्रत्येक योजना जनतेच्या मुळावरच उठल्या आहेत. काँग्रेसच्या योजनांचेच नाव बदलून हे शासन राबवत असून, हे फेकू सरकार आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ममता पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष कचरू पा. डुकरे, विधानसभा अध्यक्ष भास्कर गुंजाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, ज्येष्ठ नेते मधुकर पा. कोकणे, पांडुरंग शिंदे, बाळासाहेब वालझाडे आदी उपस्थित होते.

इगतपुरी तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला असून, इकडे- तिकडे जाणाऱ्यांचा कोणताही परिणाम पक्षावर होणार नसल्याचे नयना गावित यांनी सांगितले. भास्कर गुंजाळ, कचरू पा. डुकरे, बाळासाहेब वालझाडे, पांडुरंग शिंदे, सुनील भोर, पंकज माळी, मथुरा जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.

इगतपुरी तालुका महिला अध्यक्षपदी मथुरा जाधव, ‘एनएसयूआय’च्या तालुकाध्यक्षपदी पंकज माळी, शहराध्यक्षपदी धनराज शर्मा, घोटी शहराध्यक्षपदी आशा बेलेकर, घोटी शहर महिला उपाध्यक्षा सीताबाई चौधरी, सरचिटणीस विमल भोर यांची नियुक्ती जाहीर करून, नियुक्तिपत्र देण्यात आले.

तालुकाध्यक्ष कचरू पा. डुकरे यांनी प्रास्ताविक केले. भास्कर गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग शिंदे यांनी आभार मानले. ज्येष्ठ नेते नथू पा. कुटके, रामनाथ शिंदे, अरुण गायकर, संपत म्हसणे, प्रा. मनोहर घोडे, देवराम मराडे, राजाराम धोंगडे, अर्जुन पा. जाधव, दशरथ जमधडे, गणपत जाधव, जितेंद्र भोर, पांडुरंग हंबीर, मथुरा जाधव, गुलाब वाजे, सोमनाथ जोशी, विलास मालुंजकर, दत्तात्रय पासलकर, साहेबराव धोंगडे, संपत वाजे, एकनाथ महाले, बहिरू कुटके, केरू पा. गोवर्धने, सुरेश गोवर्धने, भावराव जाधव, राजू जाधव, संजय तिवडे, साहेबराव बांबळे, विजय खातळे, गोपीनाथ खातळे, विजय म्हसने उपस्थित होते.