सत्ता द्या, शहराचा दोन वर्षांत कायापालट करून दाखवतो!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

येवला - अनेक वर्षांपासून येथील गाळेधारकांचे व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे. मी आत्ताच अधिकाऱ्याशी बोललो असून, गाळेधारकांना न्याय देणे शक्‍य आहे.

गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी या सगळ्या व्यावसायिकांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन कमीत कमी अनामत रकमेत गाळे उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासन जलसंपदामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील विस्थापित गाळेधारकांना दिले. सत्ता द्या, शहराचा दोन वर्षांत कायापालट करून दाखवतो, असे या वेळी बोलताना महाजन यांनी सांगितले.

येवला - अनेक वर्षांपासून येथील गाळेधारकांचे व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे. मी आत्ताच अधिकाऱ्याशी बोललो असून, गाळेधारकांना न्याय देणे शक्‍य आहे.

गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी या सगळ्या व्यावसायिकांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन कमीत कमी अनामत रकमेत गाळे उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासन जलसंपदामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील विस्थापित गाळेधारकांना दिले. सत्ता द्या, शहराचा दोन वर्षांत कायापालट करून दाखवतो, असे या वेळी बोलताना महाजन यांनी सांगितले.

भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज येथे पहाड गल्ली, गांधी मैदानामध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बंडू क्षीरसागर व भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकपदाच्या उमेदवारांसाठी महाजन यांनी सभा घेतली. आमदार राहुल आहेर, माजी आमदार मारोतराव पवार, कल्याणराव पाटील, ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक किशोर दराडे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, लक्ष्मण सावजी, शिवसेनेचे नेते संभाजी पवार, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, आत्माराम कुंभार्डे तसेच उमेदवार बंडू क्षीरसागर, सूरज पटणी, माया परदेशी, कुणाल परदेशी, छाया क्षीरसागर, छाया देसाई, वीरेंद्र मोहारे, प्रमोद सस्कर, गणेश शिंदे, सुनीता वाळुंज, सरोजिनी वखारे, पुष्पा गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.

यादरम्यान गाळेधारकांतर्फे गणेश दोडे, डिगू सोनवणे, संतोष भावसार आदींनी भेट घेतली असता त्यांनी हे आश्‍वासन दिले. पालिकेवर असलेले 22 कोटी रुपयांचे कर्ज कमी करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. महाजन म्हणाले, की अनेक वर्षे मंत्रिपद अन्‌ ठराविक पक्षाची सत्ता असूनही शहरात विकासाचा ठणठणाट आहे. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असून, विकासाची संधी तुमच्या पुढे चालून आली आहे. स्मार्टसिटी ही मोदींची संकल्पना येथे राबवून शहराचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी तुम्हाला जे जे मागाल ते ते दिले जाईल. पक्षाने बंडू क्षीरसागरांसारखा रस्त्यावरचा, लोकांना सहज भेटणारा आणि लोकांची कामे करणारा उमेदवार दिला आहे. असेच उमेदवार नगरसेवकपदासाठीदेखील असल्याने पालिकेत परिवर्तन करा.

माजी आमदार पाटील म्हणाले, की मतदार परिवर्तन करणार असून, एका वर्षात चांदवडमध्ये तब्बल 18 कोटींची विकासकामे झाली. असाच विकास येथे करण्यासाठी पालिका भाजपकडे द्या. युती सरकारने जनहिताच्या अनेक योजना राबविलेल्या असून, त्यांची शहरात अंमलबजावणी करण्यासाठी स्वच्छ व कर्तव्यदक्ष उमेदवार पक्षाने दिला आहे, त्यामुळे क्षीरसागर यांना संधी द्या, असे आवाहन जिल्हाध्यक्ष जाधव तसेच युवा नेते संभाजी पवार यांनी केले. भाजपचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी भाजप नेते बापू पाटील, गोपाळ बाबर, श्रीकांत गायकवाड, अरुण काळे, मनोज दिवटे, गोरख खैरनार, नाना लहरे, गणेश खळेकर, गीताराम दारुंकर, गाडेकर, सविता बाबर, दिनेश परदेशी, किशोर परदेशी, राजू मोहारे, दिनेश परदेशी, राम बडोदे उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्र

जळगाव : 'त्या आठही प्रवाशांचा जीव वाचवता आला असता, तर शौर्याचा आनंद साजरा केला असता..' अशा शब्दांत अमरनाथ यात्रेत दहशतवादी...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

जेलरोड (नाशिक) - "मातीच्या ढिगाऱ्याला कधी कोणी नमस्कार करतांना पाहिले आहे का?किंवा रस्त्यामध्ये पडलेली माती पायदळी तुडवली गेली...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नाशिक - ऋषिमुनींची तपोभूमी, सिद्धांची योगभूमी, फुलांच्या मुबलक आवकेमुळे गुलशनाबाद, यात्रेकरूंचं (पिलग्रीम), द्राक्ष (...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017