लैंगिक अत्याचाराला कंटाळून मुलीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

चिमठाणे (जि. धुळे) - मेथी (ता. शिंदखेडा) येथील अल्पवयीन मुलीने तिचा उपसरपंच काका व घरासमोरील तरुण वाईट नजरेने पाहतो, म्हणून जाळून घेत आत्महत्या केली. तिच्या जन्मदात्या पित्यानेच ही घटना लपवीत पोलिसांना न कळविता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कारही करून टाकले. आत्महत्येपूर्वी मुलीने आईशी मोबाईलवर साधलेल्या संपर्क साधला होता. आईची चौकशी करताना या घटनेचा उलगडा झाला. सहा दिवसांनंतर उघड झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, मुलीचे वडील भावराव आगळे, आजी ध्रुपदाबाई, काका दगा ऊर्फ अण्णा देवचंद आगळे, काकू इंदूबाई दगा आगळे, दुसरा काका शाहणा आगळे, काकू रेखा शाहणा आगळे, चुलतभाऊ देविदास दगा आगळे व सतीश दगा आगळे अशा नऊ जणांविरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आत्महत्येस प्रवृत्त करणे, मृतदेहाची विल्हेवाट लावणे व बालअत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत सात जणांना अटक झाली. त्यांना धुळे जिल्हा न्यायालयाने 26 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. ध्रुपदाबाई व सतीश आगळे फरारी आहेत. 

मेथी येथील दीक्षा भावराव आगळे (वय 15) या नववीत शिकणाऱ्या मुलीकडे उपसरपंच असलेला तिचा काका दगा ऊर्फ अण्णा देवचंद आगळे व घरासमोरील दुकानदार सचिन मधुकर सोनवणेहा वाईट नजरेने पाहत असे. प्रसंगी तो पाठलागही करत असे, विनयभंग करीत असे. याबाबत दीक्षाने वडाळी (ता. शहादा) येथे राहणारी तिची आई दीपाली यांना मोबाईलवरून ही माहिती दिली होती. तिची आई वडिलांपासून वेगळी राहते. 14 मार्चला सकाळी दीक्षाने मोबाईलवर शेवटचा मेसेज टाकला. 15 मार्चला दुपारी दोनला आई दीपाली दोंडाईचा बसस्थानकात आली. सायंकाळपर्यंत दीक्षाची वाट पाहिली. मात्र, मोबाईलही बंद येत होता. शनिवारी (ता.18) दुपारी दीपाली मेथी येथे गेली. तिने दीक्षाची चौकशी केली. भावराव याने दीक्षाचा 14 मार्चला दुपारी जळून मृत्यू झाला व तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगितले. दीपाली यांनी रविवारी (ता. 19) शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

Web Title: girl committed suicide sexual abuse