तरुणींसह महिलांच्या प्रश्‍नांवर ‘खाकी’ शोधेल मार्ग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

जळगाव - ‘तरुणींसह महिलांना अनेक समस्या असतात. योग्य मार्गदर्शन व गैरसमजुतीमुळे त्यांची फसवणूक- पिळवणूक केली जात असल्याचे दिसून येते. आता मात्र त्यांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी महिला मार्गदर्शन कक्ष स्थापन केला असून, या कक्षात कौटुंबिक कलहाव्यतिरिक्त सर्व समस्यांसह रोजगाराविषयी मार्गदर्शन केले जाईल, असे पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी येथे सांगितले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलिस अधीक्षक कार्यालयात महिला मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यात आली. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, उपअधीक्षक (गृह), परिविक्षाधीन आयपीएस मनीष कालवाणिया, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राजेशसिंह चंदेल, जयंत सुभेदार, शालिक उईके, नीता मांडवे, ॲड. मंजुळा मुंदडा, सरिता नेरकर, वासंती चौधरी, डॉ. महाश्वेता माथूरवैश्‍य, नगरसेविका ज्योती चव्हाण, जरिना बोहरा, मंगला सोनवणे, शोभा कुमावत, मीना सोनार आदी उपस्थित होते.

स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनही
महिलांच्या कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी महिला दक्षता, महिला सुरक्षा समिती यांसारख्या यंत्रणा आहेत. मात्र, महिलांच्या आयुष्यात इतरही अडचणी असतात. त्यात रोजगाराच्या समस्या, नोकरीच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आल्याचे डॉ. सुपेकर यांनी सांगितले. कक्षासाठी स्वतंत्र महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. महिलांना स्पर्धा परीक्षांसाठीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Web Title: girl & women problem ssolution by police