गोदावरीचा पूर सलग दुसऱ्या दिवशी कायम

नाशिक - गोदावरीला पुर नाही आला असं क्वचितच वर्ष, दरवर्षी आलेल्या पुराचं नाशिककर स्वागत करतात. पंचवटीला कवेत घेत पुढे सरकरणारा हा पुर पाहाणे म्हणजे दरवर्षीचा आनंद व्दीगुणीत करणंच, या वार्षीचा हा पहिला पुर.
नाशिक - गोदावरीला पुर नाही आला असं क्वचितच वर्ष, दरवर्षी आलेल्या पुराचं नाशिककर स्वागत करतात. पंचवटीला कवेत घेत पुढे सरकरणारा हा पुर पाहाणे म्हणजे दरवर्षीचा आनंद व्दीगुणीत करणंच, या वार्षीचा हा पहिला पुर.

नाशिक - संततधार पावसाचा जोर आणि गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे गोदावरीच्या पुराची स्थिती आज दुसऱ्या दिवशी कायम राहिली. रामकुंड परिसरातील दुतोंडी मारुतीच्या हनुवटीपर्यंत पुराची पातळी राहिली असून, गोदावरीमधून जायकवाडीकडे साडेचार टीएमसी पाणी रवाना झाले. गंगापूरमधून 9 हजार 302, दारणामधून 10 हजार 600, नांदूरमधमेश्‍वरमधून 29 हजार 594, चणकापूरमधून 3 हजार 85, पूनंदमधून 1 हजार 985 क्‍युसेस पाणी सोडण्यात येत आहे.

मुंबईच्या प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्राने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 48 तासांत बहुतेक ठिकाणी; तर 24 तासांत अनेक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्‍यता वर्तवली आहे. दरम्यान, आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इगतपुरीमध्ये 145, पेठमध्ये 136, त्र्यंबकेश्‍वरमध्ये 113, सुरगाण्यात 94.7 मिलिमीटर अशी अतिवृष्टी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com