नाशिक येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नाशिक - नाशिकमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात यावे, या मागणीचे साकडे आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले आहे. या मागणीचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही त्यांनी दिले.

स्मार्टसिटीच्या यादीत नाशिकचा समावेश झाला आहे. त्यातून शहराच्या विकासाला हातभार लागणार आहे, पण खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांत शैक्षणिक शुल्क भरण्याची आर्थिक क्षमता गरीब विद्यार्थ्यांमध्ये नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा होत असतानाच शहराच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नाशिकला आवश्‍यकता आहे. आमदार हिरे यांनी या सर्व बाबी निवेदनात नमूद केल्या आहेत.