पिकांना हमीभाव जाहीर केला, मग देणार केव्हा!  छगन भुजबळ

पिकांना हमीभाव जाहीर केला, मग देणार केव्हा!  छगन भुजबळ

येवला : सरकारने शेतमालाला हमीभाव जाहीर करून त्याचा गवगवा केला. पण अजूनही हमीभावाने खरेदी होत नसून शेतकरी झळ खाऊन शेतमाल विक्री करत आहेत. या भावाचा सर्वांना लाभ देण्यासाठी खरेदी केंद्रे वाढवून खरेदी करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी आज आज दिला. सरकार दुष्काळी उपाययोजना लागू करण्यास दिरंगाई करत असून अनेक तालुके वंचित ठेवत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारासह अंदरसूल व पाटोदा उपबाजार आवारात सुमारे पाच कोटीच्या विविध विकासकामाचे भुजबळ यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले.यावेळी शेतकरी मेळाव्यात भुजबळ बोलत होते.या कार्यक्रमाना आमदार नरेंद्र दराडे, जेष्ठ नेते माणिकराव शिंदे, शिवसेना नेते संभाजीराजे पवार, आमदार किशोर दराडे,बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे,राधाकिसन सोनवणे, सभापती नम्रता जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून बाजार समिती शेती आणि शेतकरी हिताची उत्तम प्रकारची कामे करत असल्याचे भुजबळ म्हणाले. सामितीने शेतकऱ्यांच्या हिताची नेहमीच कामे केले असून याचमुळे जिल्ह्यातील नामवंत बाजार समितीत आपले नाव घेतले जाते, असे सभापती शिंदे म्हणाल्या. यावेळी भारती जगताप, दिनेश आव्हाड, विनिता सोनवणे, अंदरसूल उपसमिती सभापती मकरंद सोनवणे, संचालक भास्कर कोंढरे, कातीलाल साळवे, अशोक मेंगाणे, संतू पाटील-झांबरे, मनीषा जगताप, राधाबाई गायकवाड, नंदू आट्टल, सुभाष समदडीया, प्रमोद पाटील, गोरख सुरासे, साहेबराव सैद, रायभान काळे, अॅड. सुभाषराव सोनवणे, शिवाजी वडाळकर, एकनाथ साताळकर, वसंत पवार, मंगेश भगत, बाळासाहेब लोखंडे, सचिव कैलास व्यापारे, बंडू आहेर, संजय ठोक, रवींद्र बोडके, अनिल कांगणे, सिद्धेश्वर जाधव, बाळू गायकवाड आदि उपस्थित होते.

राष्टवादीचे संचालक गैरहजर

राष्ट्रवादीचे उपसभापती गणपत कांदळकर, संचालक संजय बनकर, बाळासाहेब गुंड, मोहन शेलार, अशोक मेंगाने, नवनाथ काळे, पुष्पा शेळके हे सात संचालक आजच्या दौऱ्यात गैरहजर होते. पाटोदा उपआवारातील व्यापारी संकुलला चेअरमन यांनी मनमानी करून नाव दिल्याने गैरहजर राहील्याचे या संचालकांनी सांगितले.

ठराव करून दिले नाव : शिंदे

पाटोदा उपबाजारातील व्यापारी संकुलाला स्व. अन्साराम पाचपुते यांचे नाव सर्व संचालकांनी सर्वानुमते ठराव मंजूर केल्यामुळे दिले आहे. तत्कालीन संचालक पाचपुते यांचे उपबाजार मंजुरीसह जागा देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान असल्याने नाव देणे योग्य आहे. आज संचालकांची अनुपस्थिती गैर लागू असल्याची प्रतिक्रिया सभापती उषाताई शिंदे यांनी व्यक्त केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com