निजामपूरचे ग्रामविकास अधिकारी 'नॉट रीचेबल'

प्रा. भगवान जगदाळे
बुधवार, 23 मे 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायतीला हजेरी लावली नसून, त्यांचा मोबाईलही 'नॉट रीचेबल' येतोय. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असून, किरकोळ कागदोपत्री कामासाठी ग्रामस्थांना ताटकळत रहावे लागत आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायतीला हजेरी लावली नसून, त्यांचा मोबाईलही 'नॉट रीचेबल' येतोय. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असून, किरकोळ कागदोपत्री कामासाठी ग्रामस्थांना ताटकळत रहावे लागत आहे.

ग्रामपंचायतीच्या विकासकामांनाही त्यामुळे खीळ बसत असून, सह्यांअभावी कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहेत. ग्रामविकास अधिकारी नेमके रजेवर गेले आहेत की अजून दुसरी काही अडचण आहे? याबाबत खुद्द सरपंचांसह सदस्यांनाही काहीच माहिती नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून पर्यायी व प्रभारी ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. अशी मागणी सरपंच साधना राणे यांनी 'सकाळ'शी बोलताना केली आहे. त्यामुळे सद्या निजामपूरकरांना "कुणी ग्रामसेवक देता का ग्रामसेवक.?" असे म्हणायची वेळ आली आहे. अधिकारी रजेवर जरी असले तरी किमान ग्रामपंचायत प्रशासनाला त्याबाबत माहिती असावी. अधिकारी रजेवर असतील तर नेमके किती दिवसासाठी? हे तरी निश्चित माहीत असावे. त्यामुळे सामान्य माणसाला नेमके काय उत्तर द्यावे याची पंचाईत होते.

निजामपूर ग्रामपंचायतीला कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज...
सद्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बाबतीत निजामपूर ग्रामपंचायतीच्या पाठीमागे 'शुक्लकाष्ठ' लागल्याचे समजते. यापूर्वीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनाही दप्तर दिरंगाई व अनियमिततेच्या कारणास्तव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तडकाफडकी निलंबित केले होते. तर हल्लीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मागेही पूर्वीच्या कारकिर्दीतील कामांच्या बाबतीत चौकशीचा 'ससेमिरा' लागल्याचे समजते. पण अशा पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणूस भरडला जातो व वेठीस धरला जातो. वास्तविक सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीत नेमणूक करताना अधिकाऱ्यांची कार्यक्षमता व पूर्वेतिहास पाहूनच नेमणूक केली पाहिजे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून ताबडतोब निजामपूरचा हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सरपंचांसह ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: gram sevak of nizampur not rechable